शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उज्जैनमध्ये हरित कुंभाचा संदेश पोहोचविणार

By admin | Updated: February 8, 2016 04:33 IST

कुंभमेळ्यात गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी राबविण्यात आलेल्या हरित कुंभ उपक्रमाचा अनुकूल परिणाम दिसून आल्यानंतर आता उज्जैनसह सर्वच कुंभमेळ्यांत असा उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात येणार

नाशिक : कुंभमेळ्यात गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी राबविण्यात आलेल्या हरित कुंभ उपक्रमाचा अनुकूल परिणाम दिसून आल्यानंतर आता उज्जैनसह सर्वच कुंभमेळ्यांत असा उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात येणार आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या चेतना यात्रेचा प्रारंभ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते करण्यात आला.नाशिकमध्ये गेल्या वर्षी झालेल्या कुंभमेळ्यात लाखो भाविक आल्यानंतर गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी हरित कुंभ संकल्पना राबविण्यात आली होती. आता अन्यत्रही हरित कुंभाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. रविवारी रामकुंडावर जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अभिनेता चिन्मय उद्गीरकर, धनश्री क्षीरसागर, कांचन पगारे आदींच्या उपस्थितीत यात्रेचा प्रारंभ झाला.कुंभमेळ्यातून जलसंपत्तीचे महत्त्व आणि संवर्धनाचा संदेश दिला जातो. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात गोदावरीच्या पात्रातील शुद्ध जलामुळे सोहळ्याचे पावित्र्य जपले गेले. लोकसहभागातून नदीप्रदूषण टाळण्याचा संदेश दिला गेला. चेतना यात्रेच्या माध्यमातून चार कुंभमेळ्यांच्या ठिकाणी पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचेल आणि पर्यावरणपूरक सोहळा साकार होईल, असे मत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)