शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उजनीवरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित, १२ मेगावॅट निर्मिती होणार

By admin | Updated: September 28, 2016 19:36 IST

उजनी धरणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे उजनीची टक्केवारी १०० टक्केच्या जवळ आली

ऑनलाइन लोकमतसोलापूर/बेंबळे, दि. 28 - उजनी धरणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे उजनीची टक्केवारी १०० टक्केच्या जवळ आली आहे. त्यामुळे बुधवार सायंकाळी ५ वाजल्यापासून पॉवर हाऊस (वीज प्रकल्पासाठी १५०० क्युसेकने) पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी प्रथमच वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. या वीज प्रकल्पातून १२ मेगावॅट वीज निर्मिती चालू झाली आहे.उजनी धरणाची पाणीपातळी ४९१ मीटरच्या खाली आल्यास वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही. कारण या प्रकल्पाला १६०० क्युसेक पाणी वापरावे लागते. त्यामुळे उजनी धरणात पुरेशा पाणी साठा झाल्याशिवाय वीजप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जात नाही. सध्या उजनी धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दौंड येथुन ७६९३ क्सुसेकने पाणी धरणात येत आहे. कालव्यात चालू असलेल्या १५०० क्युसेकमध्ये वाढ करून तो १८०० करण्यात आला आहे़ तर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १५०० क्युसेक चालू केला आहे.उजनी धरण १०० टक्के होण्यास केवळ ३ टक्के म्हणजे १ टीएमसी पाणी आवश्यक आहे. परंतु उजनी धरणात ११० टक्के म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा केला जातो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ७ टीएमसी पाण्याची गरज आहे.