शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उगलेंना शिस्तभंगाची नोटीस

By admin | Updated: July 19, 2016 02:55 IST

शिवसेनेने हा प्रश्न विशिष्ट काळात सोडवण्याची भूमिका न घेता उलट त्या प्रश्नावर रहिवाशांच्या बाजूने उभे ठाकलेले नगरसेवक मोहन उगले यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे

कल्याण : गेली १८ वर्षे पालिकेत सत्तेत असूनही आधारवाडी डम्पिंग हटवण्याचा प्रश्न सोडवू न शकलेल्या शिवसेनेने हा प्रश्न विशिष्ट काळात सोडवण्याची भूमिका न घेता उलट त्या प्रश्नावर रहिवाशांच्या बाजूने उभे ठाकलेले नगरसेवक मोहन उगले यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. हे डम्पिंग ग्राऊंड दीड वर्षांत बंद होईल, असे आश्वासन देण्यासाठी आयुक्त-महापौरांनी केलेला दौरा ही नौटंकी असल्याची सडकून टीका केल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचवेळी हा प्रश्न सोडवण्याबाबत कोणतीही स्पष्ट कालमर्यादा ठरवून न घेता पक्षाच्या नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. आयुक्त-महापौर म्हणतात त्याप्रमाणे आधारवाडीचे डम्पिंग ग्राऊंड दीड वर्षांत नव्हे, तर पुढील पाच वर्षात स्थलांतरित झाल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकीय संन्यास घेईन, अशी जाहीर भूमिका शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी घेतली होती. ‘लोकमत’ तर्फे ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘आधारवाडी डम्पिंग : समस्या आणि उपाय’ या विषयावर पार पडलेल्या चर्चासत्रात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांनी डम्पिंगवचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन उदासीन असल्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना थेट महापौर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर हल्लाबोल केला होता. राजीनाम्याची भाषा आणि तसेच महापौरांवर थेट टीका करणाऱ्या उगलेंना पक्षाचे गटनेते रमेश जाधव यांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. डम्पिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी पक्षाने चक्क कारवाईची नोटीस बजावल्याने शिवसेना डम्पिंगविरोधात की नगरसेवकाविरोधात असा सवाल पक्षात उपस्थित झाला आहे. शिवाय यानिमित्ताने प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिवसनेत सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमधील दुर्गंधी, आगीच्या घटना तीव्र झाल्या की महापौर आणि आयुक्त पाहणीची नौंटकी पार पडतात, अशी कडवट टीका उगले यांनी केली होती. आधारवाडीचे डम्पिंग ग्राऊंड दीड वर्षात हटविण्याच्या घोषणा जरी केल्या जात असल्या तरी प्रशासनाची कूर्मगती पाहता येत्या पाच वर्षात जर डम्पिंगचा प्रश्न निकाली निघाला तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन आणि राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा त्यांनी उद््वेगाने केली होती. (प्रतिनिधी)सेनेला घरचा अहेर : सोमवारच्या महासभेतही उगले यांच्या नौंटंकीच्या वक्तव्याचा आणि राजीनाम्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर आणि मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी उपस्थित केला. उगले यांनी याप्रकरणी खुलासा करावा, अशी मागणी अन्य पक्षातील सदस्यांकडूनही करण्यात आली. महापौरांच्या दौऱ्याची संभावना नौटंकी अशी करून उगले यांनी शिवसेनेला एकप्रकारे घरचा आहेर दिल्याचा टोलाही विरोधकांनी लगावला.