शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मुक्त’च्या ‘पीएच.डी’ला यूजीसीचा ब्रेक

By admin | Updated: November 20, 2015 01:07 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तीनच महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या पीएच.डी च्या अभ्यासक्रमाला यूजीसीने ब्रेक लावला आहे.

- सतीश डोंगरे,  नाशिकयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तीनच महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या पीएच.डी च्या अभ्यासक्रमाला यूजीसीने ब्रेक लावला आहे. पीएच.डी अभ्यासक्रम पूर्णत: बंद करावा, अशा शब्दांत मुक्त विद्यापीठाला ठणकावले. विद्यापीठाने यापूर्वी पीएच.डी पदव्या खैरातीप्रमाणे वाटल्याच्या प्रकरणामुळेच यूजीसीने हा निर्णय घेतला असून, त्याबाबत विद्यापीठाकडून लेखी हमीही घेण्यात आली आहे. विद्यापीठात २००९ मध्ये निकष न पाळता, पीएच.डी पदवी वाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर विद्यापीठाने तांत्रिक अडचणींचे कारण देऊन, पीएच.डी बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी पदभार घेताच, पीएच.डीचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे जाहीर करीत, लागलीच पूर्ण वेळ पीएच.डी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करीत, त्यानुसार प्रवेश प्रक्रियाही राबविली. विद्यापीठाच्या मनसुब्यांवर मात्र, तीनच महिन्यांत यूजीसीने पाणी फेरले. दिल्लीत झालेल्या बैठकीत स्पष्ट शब्दांत पीएच.डी बंद करण्याचे यूजीसीने निर्देश दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून पीएच.डी चे प्रवेश घेतले जाणार नाहीत, अशी लेखी हमीदेखील घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पीएच.डी प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांचे प्रवेश रद्द केले जाऊ नयेत, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. यूजीसीच्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी केली जात असल्याने, विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत अनेक बदल केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी करताना, विद्यापीठाची चांगलीच दमछाक होत आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचीच पीएच.डी बंद केली नसून, देशभरातील सर्व दूरशिक्षण देणाऱ्या विद्यापीठाची पीएच.डी बंद करण्यात आली आहे. यूजीसीच्या नव्या अ‍ॅक्टनंतर पुन्हा पीएच.डी सुरू केली जाणार असल्याचे यूजीसीने कळविले आहे. - डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू