शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती..!’

By admin | Updated: June 5, 2016 00:30 IST

श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई मंदिर जीर्णोधार सोहळ्यात नाथाभाऊंनी सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी जेव्हा ‘घालोनिया भार राहिलो

- नंदकिशोर पाटील, मुंबई

श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई मंदिर जीर्णोधार सोहळ्यात नाथाभाऊंनी सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी जेव्हा ‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबाची’ या संतोक्तीचा उच्चार केला, तेव्हाच खरे तर ते पायउतार होणार हे निश्चित झाले होते. संकटसमयीच माणूस देवाचा धावा करत असतो. नाथाभाऊंनी तेच केले. चहूबाजूंनी आरोपांच्या फैरी सुटल्यानंतर ते आजवर कमावलेली सर्व ‘माया’ ते मुक्ताई चरणी अर्पण करायला निघाले!गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या खडसेंनी जळगाव जिल्ह्यात जे पेरले तेच उगवले. सुडाचे राजकारण करत त्यांनी आपल्या विरोधकांना कसे नामोहरण केले, याची अनेक उदहारणे जिल्ह्यात आहेत. सत्तेवर आल्यानंतर अनेकांच्या संपत्तीत वाढ होते, पण विरोधी पक्षात असताना मालामाल झालेले खडसे हे एकमेव उदहारण असेल. खडसे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला १९८९ ते २०१४ पर्यंतचा तपशील बघितला, तर कोणाचेही डोळे विस्फारतील. संत एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लक्ष्मी चतुर्भूज झाली, प्रसाद देऊनिया गेली’ तद्वत लक्ष्मीच्या हव्यासापायी खडसेंना आज पायउतार व्हावे लागले. पुण्यातील जमिनीचे प्रकरण समोर आल्यानंतर, त्यांनी ज्या निर्ढावलेपणाने त्याचे खंडण केले ते पाहता, त्यांना स्वत:वर आणि पक्षावर जरा अतीच विश्वास होता, असे वाटते. भोसरी एमआयडीसीतील जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना, परपस्पर संबंधित जमीन मालकाशी सौदा करून कोट्यवधी रुपयांची जमीन स्वत:च्या कुटुंबीयांच्या नावे खरेदी केली. वास्तविक, या जमिनीच्या सातबाऱ्यावर एमआयडीसीचा उल्लेख असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी हा व्यवहार केला. शिवाय, मंत्री म्हणून असलेल्या न्यायिक अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी घेतलेल्या ‘शपथे’चाही भंग केला. मंत्रिपदाची शपथ घेताना ‘मी माझ्या अख्यत्यारितील माहितीचा परोक्ष अथवा अपरोक्ष, स्वत:च्या वा कुटुंबाच्या फायद्यासाठी वापर करणार नाही,’ असे सर्वांसमक्ष जाहीर करावे लागते. खडसेंनी नेमके उलटे कले. हे प्रकरण ‘आॅफिस आॅफ प्रॉफिट’ या प्रकारात मोडते. त्यामुळे इतर आरोप सिद्ध नाही झाले, तरी भोसरीच्या जमिनीत खडसेंचा पाय खोलवर रुतलेला आहे, हे नक्की. कदाचित, मुख्यमंत्र्यांना याची कल्पना आली असावी, म्हणूनच त्यांनी तातडीने दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींच्या कानावर सर्व बाबी घातल्या, अन्यथा एरवी त्यांनी खडसेंची पाठराखण केली असती.राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेल्या नाथाभाऊ संकटाच्या काळात एकटे पडलेले दिसले. सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या चार-सहा महिन्यांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे चिक्की प्रकरण बाहेर आले, तेव्हा पंकजाच्या बचावासाठी खडसेंच पुढे आले. नंतर विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले तेव्हाही सुधीर मुनगंटीवर, चंद्रकात पाटील यांना सोबत घेऊन खडसेंनीच पाठराखण केली, पण जेव्हा स्वत: खडसेंवर ही वेळ आली, तेव्हा त्यांच्या बचावासाठी एकटे रावसाहेब दानवे सोडले, तर कोणीही पुढे आले नाही. यावरून पक्षात आणि मंत्रिमंडळात खडसेंविषयी काय मत आहे, हे दिसून येते. मंत्रिमंडळात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांशी खडसे यांचे खटके उडत असल्याची चर्चा होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय त्यांनी परपस्पर जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण ‘ज्येष्ठ’त्त्वाच्या जोरावर खडसे कोणालाच जुमानायला तयार नव्हते. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या खडसेंना डावलून राज्यमंत्री पदाचाही अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मोदी-शहा यांनी मुख्यमंत्री पदी बसविले, तेव्हाच खरे तर खडसेंनी बदललेल्या वाऱ्याची दिशा ओळखायला हवी होती. महसूल, कृषीसह ११ खात्यांचा पदभार आल्यानंतर ऐटीत आलेल्या नाथाभाऊंना राजकारणातील या त्सुनामीचा अंदाजच आला नाही. पर्ससन जाळ्यातून मच्छीमारांची सुटका करताना, स्वत: तेच अलगद जाळ्यात अडकले!राजीनामा देताना खडसे यांनी मोठा नैतिकतेचा आव आणला असला, तरी सहजासहजी मंत्रिपद सोडणाऱ्यांपैकी ते नाहीत. तसे असते तर आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी लालदिव्याची गाडी सरकारजमा केली असती, पण गेले दहा दिवस त्यांनी मंत्रिपद वाचविण्यासाठी सर्व आयुधे वापरली. ज्येष्ठतेचा आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकीय ताकदीचा धाक दाखवून पाहिला, पण पक्षाच्या दृष्टीने आजवर ‘असेट’ असलेले खडसे या प्रकरणांमुळे एकदम ‘लायबिलेटी’ बनल्यामुळे अखेर त्यांच्या गळ्यात घंटा बाधण्याचा निर्णय घेण्याशिवाय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नव्हता.