शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे आईच्या कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 30, 2016 16:10 IST

वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे आईच्या कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद असल्याची टाकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 30 - राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या टीका करत 'काही मुठभर लोकांना वेगळा विदर्भ हवा आहे. त्यांची इच्छा आम्ही पुर्ण होऊ देणार नाही. हे मुठभर लोक आईच्या पाठीवर नव्हे तर कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद', असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र दिन सर्वांनी साजरा केला पाहिजे असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे. 
 
'महाराष्ट्राची एक इंच भुमीदेखी वेगळी केली जाणार नाही या इच्छेने प्रत्येकाने महाराष्ट्र दिन साजरा करावा', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 'संपुर्ण मुंबई आणि महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला आहे', असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 'मुंबईतील बेस्टचे 50 बस मार्ग शिवसेना रद्द होऊ देणार नाही', अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली आहे. 
 
'मुंबई महानगरपालिकेतील रस्ते घोटाळ्याबद्दल बोलणं विरोधकांचे कामच आहे. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही.  तिसऱ्या आघाडीबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मला काही बोलायचे नाही. तिसऱ्या आघाडीची जेव्हा वेळ येईल त्यावेळी पाहू', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.