शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांची ‘लेना बँक’; मुख्यमंत्र्यांची टीका

By admin | Updated: February 19, 2017 03:16 IST

भाजपाच्या बॅँकेत मतदान रूपी ठेव ठेवा आणि पाच वर्षांत विकासाचा सव्याज परतावा घ्या, असे आवाहन करत उद्धव ठाकरे आणि आदित्य यांची लेना बँक आहे. तेथे फक्त लेना

नाशिक : भाजपाच्या बॅँकेत मतदान रूपी ठेव ठेवा आणि पाच वर्षांत विकासाचा सव्याज परतावा घ्या, असे आवाहन करत उद्धव ठाकरे आणि आदित्य यांची लेना बँक आहे. तेथे फक्त लेना आहे देना नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील सभेत केली.राज ठाकरे यांचा समाचार घेताना त्यांना आता नकलाच कराव्या लागतील. राज ठाकरे यांच्या बँकेचे हेड आॅफिस कृष्णकुंज आहे, त्यांची बाकी कुठेही शाखा नाही. राष्ट्रवादीची एक बँक आहे, परंतु सध्या ती बंद आहे, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती योग्य वेळी मिळेलच, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागात किती सभा घेतल्या, असा सवाल त्यांनी केला. मनसेने पाच वर्षांत नाशिकचा विकास केल्याच्या दाव्यावर बोलताना त्यांनी राज्य सरकारने २२०० कोटी रुपये दिल्यानेच नाशिकचा विकास झाला. बॉटनीकल उद्यानाचा रतन टाटा यांनी विकास केला, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाशिक दत्तक घेतो, पाच वर्षांत या शहराचा विकास केला नाही, तर पुन्हा तोंड दाखवणार नाही, असा शब्द देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी नागपूरचा असलो, तरी ते शहर सांभाळण्यासाठी नितीन गडकरी समर्थ आहेत, असे ते म्हणाले.