शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच ठरलं, उद्धव ठाकरेचं भाजपावर टीकास्त्र

By admin | Updated: May 3, 2017 08:48 IST

शहीद जवानांसंदर्भात प्रश्न उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या गोळीबार दोन भारतीय जवान शहीद झालेत. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 
 
पठाणकोट, उरी, मछली क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्याचे दाखल देते, हे सर्व प्रकार रोखण्यास तुमचे ते सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच ठरले, असा टोलाही उद्धव यांनी केंद्र सरकारला हाणला आहे.
 
शिवाय, जवानांचे बलिदान व्यर्थ चालले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि जवान रोज शहीद होत आहेत, असे सांगत "जय जवान आणि जय किसान"चे नारे देण्याचा अधिकार आम्हाला उरला आहे काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 
नेमके आहे सामना संपादकीयमध्ये?
 
हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून पाकड्यांनी आमच्या दोन जवानांचा शिरच्छेद केला आहे. त्याच वेळी कश्मीरात दहशतवादी हल्ल्यात सात जण ठार झाले. पाच पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि जवान रोज शहीद होत आहेत. ‘जय जवान आणि जय किसान’चे नारे देण्याचा अधिकार आम्हाला उरला आहे काय? पाकड्यांकडून आमच्या जवानांच्या निर्घृण हत्या केल्या जात आहेत. अर्थात त्यांना हौतात्म्याचा दर्जा मिळत असला तरी हे सर्व हुतात्मे हिंदुस्थानच्या भूमीवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. नायब सुभेदार परमजीत सिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांची हत्या पाकिस्तानच्या लष्कराने ज्या निर्घृणपणे केली त्या अमानुष आणि पाशवी कृत्याचा फक्त निषेध करून पाकड्यांचे काय वाकडे होणार आहे? नवे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे, ‘‘हे बलिदान व्यर्थ जाणार नाही!’’ माफ करा जेटलीजी, आम्हाला नाइलाजाने आणि विनम्रपणे सांगायलाच हवे की, जवानांचे बलिदान व्यर्थ चालले आहे. पाकिस्तानसारखा टीचभर आणि अराजकात होरपळणारा देश हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचा रोज कोथळा काढत असताना देशवासीयांना
 
नोटाबंदीच्या गुंगीचे औषध
 
देऊन झोपवता येणार नाही. उत्तर प्रदेशचा राजकीय विजय हा भाजपच्या दृष्टीने दिग्विजय असेलही; पण सीमेवर जवानांच्या ज्या प्रमाणात हत्या होत आहेत हा देशाचा पराभव आहे. वर्षभरात कोणत्याही थेट युद्धाशिवाय हजारावर जवानांचे बळी गेले आहेत. त्या शहीदांच्या शवपेटय़ांवर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी देशात राजकीय परिवर्तन झाले आहे काय? गोहत्येच्या वादात देशाची मने व मनगटे निस्तेज करून जवानांच्या हत्यांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न म्हणजे राष्ट्राला पिसाळलेल्या लांडग्यांच्या तावडीत देण्यासारखेच आहे. पाकिस्तानचे दहशतवादी व जवान आमच्या लष्करी तळांवर सतत हल्ले करीत आहेत. पठाणकोट झाले, उरी झाले, मछली क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ला झाला. हे सर्व प्रकार रोखण्यास तुमचे ते सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच ठरले. उत्तर प्रदेशच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राइकचा इतका बेंडबाजा वाजवला की, हे सर्जिकल स्ट्राइक जवानांनी केले नाही तर भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनीच केले असेच वातावरण निर्माण केले. हीसुद्धा जवानांच्या शौर्याची विटंबनाच होती; पण देश गुंगीत ढकलल्यावर बोलायचे कोणी व बोलणाऱयांवर विश्वास ठेवायचा कोणी? नोटाबंदी व गोहत्याविरोध हा देशातील
 
सर्वच समस्यांवरील रामबाण उपाय
 
असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले; पण नोटाबंदीनंतर पाकिस्तानचे हल्ले व देशांतर्गत दहशतवाद शतपटीने वाढला. गोहत्येचे पातक नको असे ज्यांना वाटते त्यांना जवानांच्या हत्येचे पातक चालते काय? मांसाहार करणाऱ्यांना विरोध, मग जवानांच्या रक्तामांसाचा जो चिखल सुरू आहे तो पाकड्यांचा शाकाहार मानून श्रद्धांजल्यांची चटईश्राद्धं उरकायची काय? हे प्रश्न घणासारखे घाव घालत आहेत. पाकिस्तानच्या सापळय़ात आम्ही फसलो आहोत. जगातले किती देश या प्रश्नी आमच्या बाजूने उभे आहेत ते पंतप्रधानांनी जाहीर करावे. संरक्षण मंत्री व संरक्षण खाते किती गांभीर्याने काम करते, ते माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची पूर्वीची वक्तव्ये आणि त्यांच्या गोव्यातील ‘रिटर्न तिकिटा’वरून स्पष्ट होते. काँग्रेस राजवटीत जवानांच्या शिरच्छेदाचे प्रकार झाले तेव्हा एका जवानाच्या बदल्यात पाकड्यांची दहा मुंडकी कापून आणू अशा वीर गर्जना करणाऱ्यांचे राज्य दिल्लीत आहे; पण पाकड्यांकडून आमच्या जवानांचा आणि स्वाभिमानाचा शिरच्छेद सुरूच आहे. राज्य बदलले आहे असे अजूनही वाटत नाही. नोटाबंदीच्या गुंगीतून आणि गोहत्येच्या मारामारीतून देश भानावर येईल त्या दिवशी उशीर झालेला असेल.