शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 17:38 IST

500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11- 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली. अशाप्रकारे अचानक नोटा रद्द करणं चुकीचं असल्याचं यावेळी उद्धव म्हणाले.

नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्रास होत आहे, नोटा बदलण्याची मुदत सरकारने वाढवायला हवी अशी मागणी त्यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या ठिकाणी सर्वात जास्त काळा पैसा आहे त्या स्वीस बॅंकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी करणार अशी विचारणाही त्यांनी केली, शिवाय  या निर्णयाचा नेत्यांना त्रास होत नसून जनतेला जास्त त्रास होत आहे, जनतेनं सर्जिकल स्ट्राईक केलं तर जड जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला. 

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-  

- दिवाळीला ज्या लक्ष्मीचे पुजन केले आता ती लक्ष्मीच राहिली नाही
- मोदींनी मन की बात करण्याऐवजी धन की बात केली पण जन की बात केली नाही
- देशातून काळा पैसा हद्दपार करावा या योजनेला माझा विरोध नाही. 
- मोदींनी सर्जीकल स्ट्राईक केला होता.  ते धाडसी पाऊल होते. पण आता काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदींनी जो धाडसी      निर्णय घेतला आहे तो आता अंगाशी येतोय असं वाटतंय
- मोरारजी देसाई यांनी देखील असा निर्णय घेतला होता पण त्याचे काय झाले आपल्याला माहिती आहे. 
- मुलुंड - ठाण्यात बँकेच्या बाहेरील रांगेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण?
- लग्न रद्द झाली आहेत
- रूग्णालयात अडचणी  येत आहेत
- आता घराघरात कॅमेरे लावणार का? 
- लोकांच्या बँक लॉकर्सवर नजर ठेवणार
- आज सामन्य नागरिकांना त्रास होतोय त्या सामान्य नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे हे विसरू नका
- जनता पुढील निवडणुकीत धडा शिकवेल
- जनता सर्जिकल स्ट्राईक करेल हे लक्षात ठेवा
- पैसे भरताना एका क्षणात तो व्यक्ती वारला याची जबाबदारी कोण घेणार 
- 56 इंचाची छाती 5600 इंच करा पण हिम्मत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक आणि तिथला काळा पैसा भारतात आणून  दाखवा
- सामान्य माणसाला त्रास देण्याऐवजी जिथे काळ्या पैशाचा उगम आहे तिथे कारवाई करा
- सामान्य नागरिकांना होणारा त्रास बंद झालाच पाहिजे.
- ज्या जनतेच्या भल्यासाठी तुम्ही काम करताय असं दाखवताय त्या जनतेला त्रास का देताय?
- हा त्रास संपला नाही तर जनता जनतेचा अधिकार वापरेल
- ठाण्यात बँकेत पैसे भरताना ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या मृत्यूला ज्या व्यक्तीने निर्णय जाहिर केला तो व्यक्ती    जबाबदार