शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना न सांगता सह्या घेतल्या

By admin | Updated: July 19, 2016 05:18 IST

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात संपत्तीवरून वाद निर्माण झाला.

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात संपत्तीवरून वाद निर्माण झाला. सोमवारी जयदेव ठाकरे यांची उलटतपासणी सुरू झाली. या उलटतपासणीत त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची मनस्थिती ठीक नसताना त्यांना न सांगताच अनेक कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या, असा दावा उच्च न्यायालयात केला आहे.उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी व्हील चेअरवर बसलेल्या जयदेव ठाकरे यांची उलटतपासणी घेतली. जयदेव यांच्याबरोबर त्यांची तिसरी पत्नी अनुराधा आणि मुलगी माधुरीही न्यायालयात उपस्थित होती. जयदेव यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर त्यांना इंग्रजीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे भाषांतर करण्यासाठी दुभाष्या देण्यात आल्या. उलटतपासणीच्या पहिल्याच दिवशी जयदेव यांना ५८ प्रश्न विचारण्यात आले. काही प्रश्नांच्यावेळी जयदेव तणावात असल्याचे दिसले. त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरेठाकरे कुटूंबातील असून न्यायालयात सांगणे योग्य नाही, असे म्हणत टाळली.तुम्ही (जयदेव) दावा केल्याप्रमाणे, उद्धव यांनी बाळासाहेबांची काही कागदपत्रांवर त्यांना न सांगता सह्या घेतल्या, त्या सह्या कशासाठी घेण्यात आल्या? असा प्रश्न जयदेव यांना करण्यात आल्यावर त्यांनी बाळसाहेबांची आणि आपली जानेवारी ते आॅक्टोबर २०११ मध्ये संपत्तीविषयी चर्चा झाल्याचे न्या. गौतपम पटेल यांना सांगितले.‘बाळासाहेब मला संपत्तीत वाटा देणार होते, असे खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितले. मात्र आमच्यातले हे संभाषण मी उद्धवला कधीच सांगितले नाही. कारण बाळासाहेबांना या कारणामुळे आमच्यात वाद नको होते. म्हणूनच त्यांनी मला हे उद्धवला सांगू नकोस, असे सांगितले होते,’ असे जयदेव यांनी न्यायालयाला सांगितले. २०१३ मध्ये दावा दाखल केल्यानंतर उद्धव आणि आपले संभाषण झालेच नाही. मी त्याला मेसेज (मोबाईल) केला. मात्र त्याने (उद्धव) त्याला उत्तरही दिले नाही. माझ्याकडून हे संबंध चांगले आहेत,’ असेही जयदेव यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.>2003नंतर ‘मातोश्री’ मध्ये राहण्याची इच्छा झाली नाही का? असा प्रश्नही अ‍ॅड. कपाडिया यांनी केला. ‘२००३ नंतर बाळासाहेबांकडे मी तशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र बाळसाहेबांनी ‘त्या’ घटनेमुळे काहीच न बोलणे पसंद केले,’ असे जयदेव यांनी उलटतपासणीत सांगितले.2011मध्ये बाळासाहेबांनी इच्छापत्र तयार केले तेव्हा त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती, या आपल्या दाव्याचे समर्थन करणारे आठ साक्षीदार आहेत. मात्र उद्धवने त्यांच्यावर दबाव आणला असावा, असेही जयदेव यांनी न्यायालयाल सांगितले. जयदेव यांची उलटतपासणी मंगळवारीही सुरू राहणार आहे. बाळासाहेबांच्या इच्छापत्राविषयी कसे कळले, असा प्रश्न विचारल्यावर जयदेव यांनी आपल्याला हे वर्तमानपत्रात छापून आलेल्या वृत्तावरून समजले, असे स्पष्ट केले.