शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंवर ओढवली नामुष्की!

By admin | Updated: February 1, 2017 05:52 IST

शिवसेना आणि मनसे युतीबाबत चालू असणा-या उलटसुलट चर्चेत मंगळवारी भलतीच कलाटणी मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याच जनसंपर्क

मुंबई : शिवसेना आणि मनसे युतीबाबत चालू असणा-या उलटसुलट चर्चेत मंगळवारी भलतीच कलाटणी मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याच जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर खुलासा करण्याची नामुष्की ओढवली. मराठी माणसाच्या हितासाठी मनसे बिनशर्त शिवसेनेसोबत युती करायला तयार असल्याचा प्रस्ताव घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर मातोश्री वारी करुन आले. त्यानंतर उलटसुलट चर्चांचा ऊत आला असतानाच उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी मनसे हा पक्षच शिवसेनेत विसर्जित करण्याचे आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियात व्हायरल केला. मनसेला खरीच बिनशर्त युती हवी असेल तर लोकसभा निवडणुकीत जसा मोदींना दिला होता तसा द्या, मुंबईत एकही उमेदवार उभा करु नका, असे आवाहन मेसेजमध्ये करण्यात आले होते. शिवाय, मनसेबाबत लोकांचा झालेला भ्रमनिरास आणि पक्षाला लागलेल्या गळतीचा उल्लेख करुन खिल्ली उडविण्यात आली. मनसेला अचानक आलेला हा कळवळा म्हणजे शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाला खीळ घालण्यासाठी भाजपाची सुपारी धेऊन केले जाणारे भावनिक राजकारण असल्याचा आरोपही या मेसेजमध्ये करण्यात आला. एकीकडे मनसे बिनशर्त युतीचा प्रस्ताव घेऊन आली असताना पक्षच विसर्जित करणाचा सल्ला देणारे आणि जबरी टीका करणारे मसेज थेट पक्षप्रमुखांच्या जनसंपर्क प्रमुखाकडून आल्याने सुरुवातील ती पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचा समज झाला. त्यावरुन गदारोळ उठल्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे यांनाच याबाबत खुलासा करावा लागला. ‘मी जे बोलेन आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जी माहिती दिली जाईल तीच पक्षाची अधिकृत भूमिका असेल’ असा खुलासा त्यांनी केला. (प्रतिनिधी)तरच विश्वास बसेलजर मनसे ने शिवसेनेला बिनशर्त पांठिबा दिला आणि मुंबई महापालिकेत एकही उमेदवार उतरवणार नाही, अशी घोषणा केली तरच मनसेवर विश्वास ठेवता येईल.अन्यथा, मनसेचा अजेंडा म्हणजे भाजपाची सुपारी आहे हे सिध्द होईल. मराठी माणसांसाठी मनसेनं मुंबई महापालिका निवडणुकीत एकाही जागेवर उमेदवार उभा न करता शिवसेनेच्या स्वाभिमानी लढ्याला साथ द्यावी...!अशा आशयाचा मेसेज शिवसेना पक्षप्रमुखांच्या जनसंपर्क प्रमुखाकडून पाठविण्यात आला.