शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव यांचे आदेश शिंदेंकडून धाब्यावर?

By admin | Updated: July 15, 2017 02:07 IST

ठाकरे यांचा आदेश धाब्यावर बसवून शिंदे यांच्याकडून जमीन खरेदीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) उद्या शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला जाहीर विरोध करून याकरिता जमीन संपादन रोखण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना केली असतानाही ठाकरे यांचा आदेश धाब्यावर बसवून शिंदे यांच्याकडून जमीन खरेदीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) उद्या शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाणार आहे. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरली आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे शनिवारी (आज) शिंदे यांच्या उपस्थितीत खरेदी प्रक्रियेचा कार्यक्रम समारंभपूर्वक पार पडणार आहे. जमीन संपादनास विरोध करणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीने या सोहळ्याला विरोध केला असून ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने हा लढा लढत असून वेळ पडल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागील महिन्यात २९ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात जोपर्यंत शेतकऱ्यांचे हित साधले जात नाही, तोपर्यंत समृद्धी महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. याच भाषणात त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना आपण याबाबत स्पष्ट आदेश दिल्याचे नमूद केले आहे. मग, जर पक्षप्रमुखांचे समृद्धी महामार्ग न होण्याचे आदेश असतील, तर शिंदे हे मंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून उद्या जमिनीच्या नोंदणी सोहळ्याला हजर राहणार आहेत का? नागपूर येथे कालच्या कार्यक्रमालाही ते कुणाच्या आदेशावरून हजर राहिले, असे सवाल केले जात आहेत.कार्यक्रमाचे पूर्वसंध्येला ठिकाण बदललेपूर्वनियोजित वेळापत्रकानुसार शहापूर येथे हा कार्यक्रम उद्या होणार होता. तसे मेसेजही प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींना करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी आपली नाराजी प्रकट करून तो उधळून लावतील या भीतीने बिथरलेल्या रस्तेविकास महामंडळाने आता हा कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, तरीही शेतकरी त्यात आठकाठी करणार की यापासून चार हात दूर राहणार, याबाबतही औत्सुक्य निर्माण झाले आहे.समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनात सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना विहिरीत जीव द्यायचाच आहे, त्यांनी तो द्यावा. परंतु आम्ही आमचा लढा कायदेशीर मार्गाने सुरूच ठेवू.- बबन हरणे, पदाधिकारी, शेतकरी संघर्ष समिती