शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

"धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही", उदयनराजेंकडून मराठा समाजातील युवकांना आवाहन

By ravalnath.patil | Updated: October 1, 2020 17:04 IST

Udayanraje Bhosale on Beed Maratha youth suicide on reservation : राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी आत्महत्या यासारखे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे"राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणे हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे"

मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच, या मुद्दयावरून बीड जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी दु:ख व्यक्त केले असून राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी आत्महत्या यासारखे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे.

यासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारा बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण राहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत."

याचबरोबर, राहाडे परिवारासाठी ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. समाजातील नवयुवकांना आमचे आवाहन असेल. राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणे हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे, असा धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि यातून काही निष्पन्न होणार नाही, असे ट्विट उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

याशिवाय, मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहेत हे मान्य आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत. त्यामुळे विजय निश्चित आपला होईल, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

सुसाईड नोट लिहून 'या' विद्यार्थ्याची मराठा आरक्षणासाठी आत्महत्यामी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षण