शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘म...मराठीचा’ यू-ट्यूब वाहिनी

By admin | Updated: February 27, 2016 03:54 IST

तरुणांनी मराठी साहित्याकडे वळावे यासाठी यामिनी दळवी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने पुढाकार घेतला आहे. २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनानिमित्त ती ‘म...मराठीचा’ ही यू-ट्यूब

- निकिता तिवारी,  मुंबईतरुणांनी मराठी साहित्याकडे वळावे यासाठी यामिनी दळवी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने पुढाकार घेतला आहे. २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनानिमित्त ती ‘म...मराठीचा’ ही यू-ट्यूब वाहिनी सुरू करणार आहे. ‘म...मराठीचा’ यू-टयुब चॅनेल लाँच करण्यासाठी अनेक तरुण एकत्र येणार आहेत. यात मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य, कला इ. संंबंधित वेगवेगळे उपक्रम असणार आहेत. या चॅनेलचे मध्यवर्ती कार्यकारी मंडळ म्हणून पूजा भांडगे, अमोल शिंदे, प्रसाद हावळे, शशिकांत कोळ, लीना दातार, प्रथमेश तुंगावकर काम पाहणार आहेत. ही सगळी तरुण मंडळी स्वत: वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरी करत असून मराठी भाषा सुदृढ व्हावी यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाशी जोडली गेली आहेत.या यू-ट्युब वाहिनीवर २७ फेबु्रवारीला कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त कुसुमाग्रज यांच्यावर आधारित माहितीपट सादर करण्यात येणार आहे. या माहितीपटामध्ये कुसुमाग्रजांच्या सहवासातील ज्येष्ठ कवींच्या मुलाखती आणि आताच्या पिढीने सादर केलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांचा समावेश असणार आहे. तसेच अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांच्याही मुलाखतींचा त्यात समावेश असेल. भविष्यात या यू-ट्युब वाहिनीच्या व्यासपाठीचा वापर मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी केला जाईल. हा माहितीपट राज्यभरातील शाळांमध्ये दाखवला जाणार असून आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचेल. यासाठी विविध शाळांतील व्यवस्थापन सदस्यांशी चर्चा सुरू आहे, असे यामिनीने ‘लोकमत’ला सांगितले.