शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टाइपरायटरची टिकटिक होणार बंद!

By admin | Updated: January 16, 2016 02:06 IST

जूनमध्ये शेवटची टायपिंगची परीक्षा.

बुलडाणा: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने जून महिन्यात टाइपरायटरवर अखेरची परीक्षा होणार आहे. यापुढे आता टायपिंगच्या परीक्षा संगणकावर घेण्याचा निर्णय २ जानेवारी रोजी घेण्यात आला. प्रगत तंत्रज्ञानाचा मुद्रण यंत्राला फटका बसला असून, हे यंत्र आता इतिहासजमा होणार आहे. गत अनेक वर्षांपासून टाइपरायटर शासकीय कार्यालयांचे हे अविभाज्य घटक होते. कार्यालयाच्या कामकाजाचा आत्मा असलेल्या टाइपरायटरची आता अखेरची घटका जवळ आली आहे. १८७0 मध्ये हॅन्सन बॉल याने पहिला व्यावसायिक टाइपरायटर तयार केला. कालांतराने या टाइपरायटरकडे शासकीय कामकाजाची धुरा आली. पुढे हे मुद्रण यंत्र शासकीय कामकाजाचा आत्माच बनले. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी टायपिंगशिवाय पर्याय नसल्यामुळे दहावीनंतर पुढचे शिक्षण घेताना ह्यटायपिंग करून घेह्ण असा सल्ला मुलांना हमखास दिला जायचा. कितीही शिकला तरी टायपिंग असल्याशिवाय नोकरी लागत नव्हती. त्यामुळे दहावीनंतर विद्यार्थ्यांचा ओढा टायपिंग करण्याकडे असायचा. त्यामुळे टायपिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असायची. सकाळी ६ पासून रात्री १0 पर्यंत संस्थांमध्ये बॅचेस चालायच्या. टायपिंग क्लासला प्रवेशासाठी रांगा लागायच्या. आधुनिकतेची कास धरत टाइपरायटर बंद करून संगणकावर टायपिंगची परीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने २0१३ साली घेतला होता. तेव्हापासून संगणक आणि टाइपरायटर अशा दोन्ही परीक्षा सुरू होत्या. आता टाइपरायटरवरची शेवटची परीक्षा जून २0१५ ला घेण्यात येणार असून, त्यानंतर टाइपरायटरची टिकटिक कायमची बंद करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.पेपरलेस कार्यप्रणाली संगणकाच्या आगमनानंतरही जवळपास २000 सालापर्यंत टायपिंगचा प्रवास बर्‍यापैकी सुरू होता; परंतु संगणकीय क्रांतीमुळे टायपिंग संस्था ओस पडू लागल्या. विद्यार्थ्यांची गर्दी कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणाकडे वळू लागली. शासकीय कामकाजातसुद्धा संगणक शिरल्यामुळे टायपिंग मशीन बनविणार्‍या कंपन्या बंद पडू लागल्या. पेपरलेस संकल्पनेमुळे संगणकीय टंकलेखनावर भर देण्यात आला. परिणामी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टाइपरायटरला ब्रेक दिला.