शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हा तर राजकीय सूडबुद्धीचा प्रकार

By admin | Updated: February 5, 2016 04:15 IST

आपल्याविरुध्द खटला चालविण्याची सीबीआयला दिलेली परवानगी हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे. डिसेंबर २०१३ मध्येही सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे खटला चालविण्यासाठी अनुमती मागितली होती

मुंबई : आपल्याविरुध्द खटला चालविण्याची सीबीआयला दिलेली परवानगी हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे. डिसेंबर २०१३ मध्येही सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे खटला चालविण्यासाठी अनुमती मागितली होती. परंतु, देशातील सर्वोच्च विधीतज्ज्ञांनी सबळ पुरावे नसल्याचा अभिप्राय नोंदविल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी खटला चालविण्यास परवानगी नाकारली होती, अशी प्रतिक्रिया खा. अशोक चव्हाण यांनी दिली.या प्रकरणाची सीबीआय चौकशी जुलै २०१२ मध्ये संपल्यानंतर या प्रकरणात कोणतेही नवीन पुरावे समोर आलेले नाहीत किंवा नवीन चौकशी देखील झालेली नाही. जुलै २०१२ मध्ये पूर्ण झालेल्या ज्या सीबीआय चौकशीच्या आधारे खटला चालविण्यास तत्कालीन राज्यपाल महोदयांनी परवानगी नाकारली होती; आता त्याच चौकशीच्या आधारे नव्याने खटला चालविण्याची मागणी करणे आश्चर्यकारक आहे असेही चव्हाण म्हणाले.डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन राज्यपालांनी परवानगी नाकारल्यानंतर सीबीआयने आपले नाव आरोपपत्रातून वगळण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यासंदर्भात जुलै २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली एक याचिका अद्याप प्रलंबीत आहे. दोन वर्षांपूर्वी आपले नाव आरोपपत्रातून वगळण्याची मागणी करणारी सीबीआय केंद्रात व राज्यात सत्तांतर होताच, यू-टर्न घेऊन खटला चालविण्याची परवानगी मागते, हे राजकीय दबावाचे द्योतक आहे, असे खा. चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.सीबीआयने सरकारच्या दबावामुळेच खटल्यासाठी राज्यपालांकडे नव्याने परवानगी मागितली आहे. भाजपाचे खासदार किरिट सोमय्या यांनी आपल्याविरुद्ध खटला चालविण्याची नव्याने परवानगी देण्यात यावी, असे पत्र राज्य सरकारला लिहिले होते. सीबीआय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे खटला चालविण्याची मागणी करण्यासाठी राज्य सरकारने थेट सीबीआयशी पत्रव्यवहार कसा केला, हेच अनाकलनीय आहे. राज्य सरकार सातत्याने ज्या पाटील आयोगाच्या अहवालाचा दाखला देत आहे, त्या आयोगाच्या अहवालात खा. आपल्याविरुद्ध भारतीय दंड विधानांतर्गत खटला चालविता येईल, असे सबळ पुरावे समोर आलेले नाहीत. शिवाय सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाचा अहवाल सीबीआय चौकशीचा पुरावा असूच शकत नाही, असे खा. चव्हाण यांनी म्हटले आहे.