शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

भूखंड लाटण्याचे प्रकार सुरूच

By admin | Updated: May 16, 2016 03:14 IST

सिडकोचे मोकळे भूखंड लाटण्याचे प्रकार शहरात सुरूच

नवी मुंबई : सिडकोचे मोकळे भूखंड लाटण्याचे प्रकार शहरात सुरूच असून त्याला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड लाटल्याचा प्रकार कोपरखैरणेत उघडकीस आला असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड माफियांकडून राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकारात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे.दिघा येथील अनधिकृत बांधकामप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर शहरातील इतरही अनधिकृत बांधकामे प्रकाशात आली आहेत. आजतागायत ज्या बांधकामांकडे संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले होते, त्यावरही गत काही दिवसांत कारवाया झालेल्या आहेत. मागील काही वर्षांत नवी मुंबईत सर्वाधिक अनधिकृत बांधकामे झालेली असून ती सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर आहेत. त्यामध्ये झोपड्यांसह गगनचुंबी इमारतींचाही समावेश आहे. भूमाफियांकडून सिडको अथवा एमआयडीसीचे भूखंड हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचा देखील वापर केला जात आहे. दिघा प्रकरणात हे उघड झालेले असतानाच कोपरखैरणेत देखील सिडकोचा भूखंड लाटण्यासाठी असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथे रेल्वे रुळालगतच्या मोकळ्या जागेवर दोन वर्षांपासून चार मजली इमारती उभारणीचे काम सुरू होते. काही महिन्यांपूर्वी त्याठिकाणचे बांधकाम झाल्यानंतर संबंधिताने तिथल्या घरांच्या विक्रीला सुरवात केली होती. भूखंड क्रमांक १२७ ते १३८ अशा १२ भूखंडांवर हे चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मात्र त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू असताना सिडकोच्या भूमी भूमापन विभागाच्या अथवा अतिक्रमणविरोधी पथकाच्या निदर्शनास आले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.सदर भूखंडावर जुने घर असल्याचे भासवून त्या घराची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आलेली होती. यानुसार सदर घराच्या पुनर्बांधणीच्या बहाण्याने भूखंड लाटत त्याठिकाणी अनधिकृत इमारत उभारण्यात आलेली होती. यानुसार शीतल इंटरप्रायजेसचा देवजी चौधरी याच्यासह ज्यांच्या नावे बनावट घरपट्ट्या बनवण्यात आलेल्या होत्या अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी सिडकोकडून सदर भूखंड वितरीत झाल्याची बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामाला परवानगी देखील मिळवलेली होती. परंतु ही कागदपत्रे बनावट असल्याचे पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना कळल्यानंतरही त्यांनी मौन बाळगल्याचे समजते. सदर अनधिकृत बांधकामांच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असून परिसरातले इतरही भूखंड भूमाफियांनी लाटल्याचे सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)।आठ जणांवर गुन्हेभूखंडावर जुने घर असल्याचे भासवून त्या घराची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आलेली होती. यानुसार सदर घराच्या पुनर्बांधणीच्या बहाण्याने भूखंड लाटत त्याठिकाणी अनधिकृत इमारत उभारण्यात आलेली होती. यानुसार शीतल इंटरप्रायजेसचा देवजी चौधरी याच्यासह ज्यांच्या नावे बनावट घरपट्ट्या बनवण्यात आलेल्या होत्या अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.