ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - जुहू समुद्राजवळ दोन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एका वाजताच्या सुमारास घडली. दोघे जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.
जुहू समुद्राजवळ वारंवार तुरुण बुडाल्याच्या घटना घडत आहेत. आज दुपारी एक वाजता जुहू समुद्रकिनारी फिरायला गेलेले पाच तरुण बुडाल्याची माहिती, पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. अग्नीशमन दलाच्या जवानांना तिघांना वाचविण्यात यश आले असून अजून दोघांचा शोध सुरु आहे. या दोन्ही तरुणांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.