शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दो साल बुरा हाल.. सोलापूरमध्ये काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

By admin | Updated: May 30, 2016 16:13 IST

सरकारला २ वर्षे पूर्ण झाली पण अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झाली नाही असे सांगत शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी सोलापूरमध्ये बोंबाबोंब आंदोलन केले़.

अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३० -  मोदी सरकार अच्छे दिनच्या नावाखाली संपूर्ण देशातील जनतेला फसविण्याचे काम केले आहे़. केंद्र सरकारला २ वर्षे पूर्ण झाली परंतू अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़, दो साल बुरा हाल अशीच सरकारची अवस्था झाल्याने शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले़ याचवेळी अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली़
या आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, निर्मलाताई ठोकळ, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महापौर सुशिलाताई आबुटे, सरचिटणीस अलका राठोड, माजी महापौर नलिनीताई चंदेले, सोमपा पक्षनेते संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, नगरसेवक आरीफ शेख, चेतन नरोटे, शिवा बाटलीवाला, अनिल पल्ली, सुनिल खटके, सरचिटणीस राहुल गायकवाड, आझम सैपन, अमोल शिंदे, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, पैगंबर शेख, दत्तू बंदपट्टे, नगरसेविका अश्विनी जाधव, सुजाता आकेन, मंदाकिनी तोडकरी, फिरदोस पटेल, तिरूपती परकीपंडला, सातलिंग शटगार, प्रा़ सिद्राम सलवदे, अर्जुन पाटील, भिमाशंकर जमादार, जावेद शिकलगार, अरूण इंगळे, हणमंत सायबोळू, युवराज पंतूवाले, दिनेश धोडके, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, पार्वती काळे, हारूण शेख, अनिल मस्के, सोपान थोरात, सुमन जाधव आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली़ लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही़ सत्तेत आल्यास काळा पैसा परत आणू, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणार, महागाई कमी करणार, जीवनाश्यक वस्तुच्या किंमती कमी करणार, स्वस्त धान्य देण्याकरिता सरकारकडून दिले जाणारे अशंदान बंद करण्यात आले़ इंदिरा आवास योजना बंद करण्यात आली़ शासकीय योजना या धुळफेक अशा विविध घोषणा अद्याप तशाच आहेत़ त्या पूर्णत्वास आल्या नाहीत़ आश्वासनाची खैरात करणारे भाजप सरकार खोटारडे आहे़ असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे़
कोण काय म्हणाले :
दुष्काळाने देश होरपळत असताना भाजप सरकार कोणतीच मदत करीत नाही : धर्मा भोसले
महात्मा गांधीजीची हत्या आरएसएसने केली : माजी महापौर निर्मलाताई ठोकळ
आयत्या पिठावर रेघोट्या मारणाºया भाजप सरकारला लाज वाटली पाहिजे : महापौर सुशिला आबुटे 
मोदी सरकारचे जाहिरात युग सुरू आहे : माजी आमदार दिलीप माने