शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

दुचाकीने पोलिसाला नेले फरफटत

By admin | Updated: September 21, 2016 03:09 IST

नाकाबंदीदरम्यान दुचाकी अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला अल्पवयीन दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याचा प्रकार सीवूड येथे घडला.

नवी मुंबई : नाकाबंदीदरम्यान दुचाकी अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला अल्पवयीन दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याचा प्रकार सीवूड येथे घडला. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकासह दुचाकीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी सीवूड पुलालगत हा प्रकार घडला. एनआरआय पोलिसांमार्फत त्याठिकाणी नाकाबंदीत वाहनांची झाडाझडती सुरू होती. यावेळी बंदोबस्तावर कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक सुनील कंकरे यांनी एका संशयास्पद दुचाकीस्वाराला चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला. परंतु सदर दुचाकीस्वाराने कंकरे यांना चकमा देत नाकाबंदीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावल्यामुळे कंकरे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. याकरिता त्यांनी मोटरसायकल पकडलेली असतानाही, अल्पवयीन चालकाने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अखेर बंदोबस्तावर असलेल्या इतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मोटरसायकलस्वाराला पाठलाग करून पकडले. त्याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्यास मोटरसायकलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा नुकताच कायदा झालेला आहे. त्यानुसार मोटरसायकल मालक जावेद खान याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सांगितले. तर जखमी पोलीस अधिकारी कंकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताला व शरीराच्या काही भागावर जखमा झाल्या आहेत. (प्रतिनिधी)