शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती

By admin | Updated: February 7, 2016 04:08 IST

स्वचलित दुचाकी वाहन चालविणारा स्वत: चालक आणि त्याच्या मागे बसणारा प्रवासी अशा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आली.

- परिवहनचा आदेश

मुंबई : स्वचलित दुचाकी वाहन चालविणारा स्वत: चालक आणि त्याच्या मागे बसणारा प्रवासी अशा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांनी यासंदर्भात काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.दुचाकी वाहनचालकांना शिकाऊ परवाना देताना त्यांच्याकडून हेल्मेट वापराविषयी हमीपत्र लिहून घेतले जाते. आता दुचाकी वाहन विक्रेत्यांनी वाहन विकताना खरेदीदारास दोन हेल्मेट पुरवावेत आणि तसे कागदपत्रांमध्ये नमूद करावे, असे सक्त निर्देश परिवहन विभागाकडून देण्यात येणार आहेत. तसेच, वाहन नोंदणी अधिकाऱ्याने वाहन नोंदणीसाठी त्यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांत वाहननासोबत दोन हेल्मेट पुरविण्यात आल्याचे नमूद असल्याची खातरजमा करावी, असे आदेशात म्हटले आहे. पुणे शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात शिवसेनेसह विविध पक्ष रस्त्यावर उतरले असूनही परिवहन विभागाने राज्यभर हेल्मेट सक्तीचा आदेश काढून, दबाव आला तरी माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. मोटर वाहन कायदा; १९८८ च्या कलम १२९ नुसार दुचाकी वाहनचालक आणि त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहेच. पण या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी कधीही झाली नाही. ती व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर, काटेकोर अंमलबजावणीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. (विशेष प्रतिनिधी)राज ठाकरेंचा विरोधमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध दर्शविला. हेल्मेट उत्पादकांच्या भल्यासाठी हा निर्णय लादला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.आघाडी सरकार असताना हेल्मेट सक्तीला विरोध करणारे आता सक्ती करताहेत, हे सत्तेचे शहाणपण आहे, असा टोला त्यांनी हाणला. हेल्मेट वापरल्याने माणसाचा जीव वाचतो हे मला मान्य आहे पण त्याची सक्ती नको, असे विधान त्यांनी पुण्यात केले. माघार घेणार नाहीहेल्मेट सक्ती मागे घ्यावी अशी मागणी होत असली तरी हा निर्णय मागे घेण्यात येणार नाही, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. हेल्मेट उत्पादकांच्या हिताचा वगैरे निर्णय राज्य सरकारने अजिबात घेतलेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.