शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

By admin | Updated: June 10, 2016 02:55 IST

मुंबई, ठाणेसह नवी मुंबई परिसरामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : मुंबई, ठाणेसह नवी मुंबई परिसरामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींकडून ७ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून ९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. हे गुन्हे नियंत्रणात आणण्याच्या सूचना आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुन्हे शाखेचे उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे राजन जगताप, प्रतापराव कदम, उत्तम दुंदळे, सुनील सावंत यांनी विशेष शोधमोहीम राबविली. तपास सुरू असताना जुईनगर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी महमद हसन गुलामअली मुच्छडा या मुंब्य्रातील तरूणाला अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने मुंब्रा परिसरातीलच दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरी केलेल्या ९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. यामध्ये नेरूळ, मुंबई आरसीएफ, शांतीनगर, शिर्डी पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी एक, मुंब्रा पोलीस स्टेशनमधील दोन असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. मोटारसायकल चोरल्यानंतर हे आरोपी मूळ रजिस्ट्रेशन क्रमांक बदलून त्या वाहनांची विक्री करत होते. गाडीचे पेपर्स दोन दिवसात देतो असे सांगून फसवत होते. (प्रतिनिधी)