शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणाऱ्या चौकडीला अटक

By admin | Updated: August 2, 2016 02:19 IST

एपीएमसी पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी तिघांना पुणे येथून अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी तिघांना पुणे येथून अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्यांनी मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातून चोरलेल्या १७ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.वापरलेली दुचाकी खरेदीच्या व्यवहारातून प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकीचोर टोळीला अटक केली आहे. रोहित बेहडे यांनी अक्षय आतकरी याच्याकडून जुनी दुचाकी खरेदी केली होती. परंतु आतकरी हा त्यांना गाडीचे आवश्यक मूळ पेपर देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे संशय आल्यामुळे बेहडे यांनी एपीएमसी पोलिसांकडे यासंबंधी तक्रार केली होती. उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे, निरीक्षक प्रमोद रोमण यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. तपासादरम्यान अक्षय उत्तम आतकरी याचा फोटो व मोबाइल नंबर पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक उध्दव डमाळे, उपनिरीक्षक सुनील तारमाळे व पोलीस शिपाई सचिन ठोंबरे, लहू भोसले, अनिल चव्हाण, विजय पाटील यांच्या पथकाने बनावट ग्राहकाद्वारे कल्याण स्थानकात बोलावून आतकरीला ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याने इतर साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार जुन्नर परिसरात सापळा रचून इतर तिघांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक जण अल्पवयीन असून उर्वरित दोघांची अभिजित तांबे (२३), गणेश खिल्लारी (२७) अशी नावे आहेत. तपास पथकाने १७ दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरीच्या दुचाकींमध्ये २ बजाज डिस्कव्हर तर १ स्प्लेंडर व इतर १४ पल्सर आहेत. पल्सरच्या हँडलवर जोर लावून लॉक तोडणे शक्य असल्याने त्याच गाड्यांची मोठ्या संख्येने चोरी केल्याची कबुली अटक टोळीने दिली आहे. तर नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व इतर परिसरातून या दुचाकी त्यांनी चोरल्या होत्या. त्यानंतर पुण्याच्या नारायणगाव, ओतुर अशा ग्रामीण भागात १५ ते २० हजार रुपयांना त्याची विक्री केली होती. आतकरी व तांबे या दोघांना यापूर्वी रायगड पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली होती. (प्रतिनिधी)