नागपूर : राज्यात ताडोबा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या दोन ठिकाणी बिबट सफारी सुरू करण्यात येत असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात. दीपिका चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. बिबट आता लोकवस्तीमध्ये येऊन लहान मुलांना उचलून नेत आहेत. मानवी वस्त्यांवर हल्ले वाढले आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, राज्यात दोन ठिकाणी बिबट सफारी सुरू करण्यात येत असून त्यात येथील बिबट सोडण्यात येतील असे सांगितले. यासोबतच त्यांनी जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये वाघांपासून संरक्षण करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. तसेच उपाययोजनांबाबत आणखी काही सूचना असल्यास त्या सुचवण्याचे आवाहनही केले. (प्रतिनिधी)
राज्यात दोन ठिकाणी बिबट सफारी
By admin | Updated: December 15, 2015 03:55 IST