जळगाव/धुळे : खान्देशात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन बळी घेतले असून, शेतीपिकांना प्रचंड तडाखा बसला आहे. अमळनेरमध्ये सुमारे 200 घरांची पडझड झाली.
शिरपूरला गेल्या 24 तासांत 76 मि.मी. पाऊस झाला. अमळनेर तालुक्यातील राहुल उदेसिंग पारधी (18) याचा बुडून तर भिंत पडून शुभम पाटील (19) याचा मृत्यू झाला. शुभमचा मोठा भाऊ विनोद या दुर्घटनेत जखमी झाला. अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसामुळे 2क्क् मातीच्या घरांची अंशत: पडझड झाली. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकेही पाण्याखाली गेली. पावसाने तालुक्यात लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण व 2क् दरवाजे एक मीटरने उघडले. (प्रतिनिधी)
गोदावरीला पूर
रविवारी मध्यरात्री शहरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी 95 टक्क्यांर्पयत वाढली. दुपारी
4 वाजेर्पयत धरणातून सुमारे 4,296 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रत करण्यात आला. त्यामुळे गोदावरीला पूर आल्याने गोदाघाट संपूर्णत: पाण्याखाली गेला होता. रामकुंडावरील दुतोंडय़ा मारुती कमरेर्पयत बुडाला होता.
गंगापूर धरणाच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्यास आणखी पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याने नदीपात्रलगतच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात घाटघर येथे साडेसहा इंचाहून अधिक पाऊस झाला. सोमवारी सकाळी 6 वाजता भंडारदरा धरण काठोकाठ भरून वाहू लागले. त्यानंतर मोसमातील सर्वाधिक म्हणजेच 3 हजार 24क् क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
मुळा धरण भरले
राहुरीत मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रत मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरण 85 टक्के भरले आहे. सोमवारी सकाळी 6 वाजेपासून धरणातून 7,31क् क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग
पुणो जिल्ह्यातील पवना धरणातून 3,7क्क् क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे सहाही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. पुणो शहराच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्नेत असलेल्या पवना धरण क्षेत्रत या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाला.