शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांची नवी नोट लाचखोरांच्या सोयीची

By admin | Updated: November 15, 2016 19:48 IST

काळा पैसा रोखण्यासाठी जुन्या नोटांवर बंदी घालून दोन हजारची नवीन नोट चलनात आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय भ्रष्टाचारी आणिं काळा पैसा

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५  : काळा पैसा रोखण्यासाठी जुन्या नोटांवर बंदी घालून दोन हजारची नवीन नोट चलनात आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय भ्रष्टाचारी आणिं काळा पैसा जमविणा-यांचा सोयीचा ठरत असल्याची टीका प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. लाचखोरांसाठी दोन हजाराची नोट अधिक सोयीची ठरत असल्याचे कोल्हापूर येथील प्रकरणातून स्पष्ट झाल्याचा दावा सावंत यांनी केला.

कोल्हापूर येथे एका मुख्याध्यापकाच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहायक चंद्र्रकांत सावर्डेकरला ३५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सावर्डेकरकडून दोन हजार रूपयांच्या १७ नोटा जप्त करण्यात आल्या. पाचशे आणि हजारची नोट बंद झाल्याने सावर्डेकरने लाच म्हणून दोन हजारांच्या नोटांची मागणी केली होती. एकीकडे आपल्याच हक्काचे पैसे मिळावेत म्हणून कोट्यवधी लोक बँकांच्या दारात उभे असताना सावर्डेकरांसारखे लाचखोर याच दोन हजारच्या नोटांच्या माध्यमातून चाल मागत आहेत. मोठ्या रकमेच्या परंतु छोट्या आकाराच्या या नवीन नोटेमुळे लाचखोरांची सोय झाली असून सरकारचा दावा फोल ठरल्याची टीका सचिन सावंत यांनी केली.

काळा पैसा पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी मोदी सरकारने कोणतेच पाऊल उचलले नाही. केवळ नोटाबंदीचा निर्णय घेत देशभरातील सर्वसामान्य जनतेला अमर्याद कष्टांच्या वावटळीत ढकलून दिले. लोकपाललोकपाल नियुक्ती बाबत काहीच कारवाई केली नाही. काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत धनदांडग्या उद्योजकांवर, व्यापा-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका प्रामाणिक नाही आणि पंतप्रधानांचे अश्रू हे दिखाव्याचेच ठरतील, असे सावंत म्हणाले. दोन हजार रूपयांच्या नवीन नोटांचा जसा रंग उडतोय तसाच गरिबांच्या चेह-याचा रंग उडाला आहे. शेतमाल विकला जात नाही, ग्रामीण भागात नव्या नोटाच पोहचल्या नाहीत. हातावर पोट असणा-या ‘नाही रे’ वर्गाने ५० दिवस उपाशी राहण्याचा सल्ला देऊन मोदी फक्त ‘आहेरे’ वगार्चाच विचार करतायत हे स्पष्ट होते, असे सावंत म्हणाले.​