शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणा स्कूलचे दोन चिमुकले बेशुद्ध

By admin | Updated: December 7, 2014 00:31 IST

दोघेही चांगले मित्र. एकाच बसमध्ये वहिरगावच्या प्रेरणा पब्लिक स्कूलमध्ये जायचे. एकाच बाकावर बसायचे. शनिवारी त्यांना औषधाच्या पाच गोळ्या सापडल्या. दोघांनीही त्या ‘शेअर’ करून खाल्ल्या.

प्रेरणा स्कूलचे दोन चिमुकले बेशुद्ध सापडलेल्या औषधाच्या गोळ्या खाल्ल्या : शिक्षकांचा बेजबाबदारपणानागपूर : दोघेही चांगले मित्र. एकाच बसमध्ये वहिरगावच्या प्रेरणा पब्लिक स्कूलमध्ये जायचे. एकाच बाकावर बसायचे. शनिवारी त्यांना औषधाच्या पाच गोळ्या सापडल्या. दोघांनीही त्या ‘शेअर’ करून खाल्ल्या. थोड्याच वेळात त्यांना भोवळ आली अन् ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी शाळेच्या प्राचार्य, शिक्षिकांनी त्यांच्या पालकांना बोलावले. पालक आल्यानंतर धावपळ करून त्यांनी या बालकांना वेळीच रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे आता चिमुकले बचावले. शाळेतील शिक्षिकांनी दाखविलेल्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांच्या पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.दिव्यांश दिनेश सोनटक्के (वय साडेचार वर्षे)आणि प्रचित संजय येरणे (वय चार वर्षे ) अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दिव्यांश उदयनगरला राहतो तर प्रचित भोलेनगरला. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांना घेण्यासाठी शाळेची व्हॅन आली. ते दोघेही विहिरगावच्या प्रेरणा पब्लिक स्कूलमध्ये शिकतात. आईवडिलांनीही आपल्या चिमुकल्यांना हसत निरोप दिला. प्राचार्य, शिक्षिकांचा असंवेदनशीलपणाशाळेत गेल्यानंतर या दोघांना कुठेतरी ‘धून ५०’ नावाच्या सीलबंद असलेल्या चार गोळ्या सापडल्या. गोळ्या पाहून दोघांनाही आनंद झाला. त्यांनी लगेच पाकिटातील सीलबंद गोळ्या बाहेर काढल्या आणि दोघेही जीवलग मित्र असल्यामुळे त्यांनी त्या आपसात वाटून खाल्ल्या. स्नेहसंमेलनासाठी शाळेत नृत्याचा सराव सुरू होता. याच दरम्यान दोघेही बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येत होती. त्यांची अवस्था पाहून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याची गरज होती. परंतु शाळेच्या प्राचार्य श्रीजल लुही यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी त्यांच्या पालकांना मोबाईलवरून माहिती देऊन शाळेत बोलावले. पालक चिंतातूर चेहऱ्याने शाळेत पोहोचले. तेथे व्हॅनही उपलब्ध नव्हती. पालकांनी सांगितल्यानंतर शाळेने व्हॅन बोलावली. त्यानंतर या दोन्ही चिमुकल्यांना सक्करदरा चौकातील अनमोल मॅटर्निटी व नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून नळीद्वारे त्यांच्या पोटातील पाणी काढून घेतले. त्यानंतर त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्याची गरज असल्याचे डॉ. राजकुमार किरतकर यांनी सांगितले. दुपारी ४.१५ वाजता हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल इंगोले यांनी रुग्णालयात पोहोचून पालकांचे बयाण नोंदवून घेतले. मुले बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना धावपळ करून तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. परंतु प्रेरणा पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांनी या चिमुकल्यांच्या पालकांना मोबाईलवरून मुले बेशुद्ध झाल्याची माहिती दिली. पालकांनी तातडीने मुलांना व्हॅनमध्ये टाकले. त्यानंतर पालक त्यांना घेऊन सक्करदरा चौकातील डॉ. राजकुमार किरतकर यांच्या रुग्णालयात आले. परंतु व्हॅनचा चालक वगळता शाळेतील प्राचार्य किंवा एकाही शिक्षिकेला या चिमुकल्यांसोबत व्हॅनमध्ये बसून रुग्णालयात जावे असे वाटले नाही. तीन तासांनी आले शुद्धीवरसक्करदरा येथील अनमोल मॅटर्निटी व नर्सिंग होममध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या चिमुकल्यांना सलाईन लावले. त्यानंतर नळी टाकून त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. तोपर्यंत ते दोघेही निपचित पडून होते. तब्बल तीन तासानंतर त्यांनी डोळे उघडले. परंतु त्यांच्या डोळ्यात गुंगी जाणवत होती. (प्रतिनिधी)