शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

अकोल्यातील दोन शिवभक्तांचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू!

By admin | Updated: August 24, 2016 00:20 IST

तोष्णीवाल ले-आउट, भाटियावाडी येथील रहिवासी युवकांचा समावेश.

अकोला, दि. २३: शहरातील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या राधाकिसन प्लॉटमधील भाटियावाडी येथील रहिवासी तसेच कुल्फी विक्रेता आणि तोष्णीवाल ले-आउट परिसरातील पिंपळेनगर येथील रहिवासी दोन युवकांचा मध्यप्रदेशातील ओंकारेश्‍वर येथे नर्मदा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. योगेश पाठक आणि संजय जोशी असे या मृतकांची नावे असून यामधील एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती आहे.मध्यप्रदेशातील उज्जैन आणि ओंकारेश्‍वर येथे श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होते. महादेवाच्या दर्शनाला अकोल्यातील युवकांसह महिलाही मोठय़ा प्रमाणात ओंकारेश्‍वर येथे दाखल होतात. श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी दर्शनासाठी शहरातील तोष्णीवाल ले-आउट आणि राधाकिसन प्लॉट येथील तब्बल १८ युवकांची चमू दर्शनासाठी शनिवारी रात्री अकोल्यातून रवाना झाली होती. रविवारचा मुक्काम ठोकल्यानंतर या युवकांनी सोमवारी दर्शन घेतले. त्यानंतर या चमूतील १५ ते १६ युवक परतले; मात्र संजय जोशी आणि योगेश पाठक यांना आणखी काही मित्र त्या ठिकाणी भेटल्याने ते सोमवारी ओंकारेश्‍वर येथे मुक्कामी राहिले. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास संजय जोशी त्यांचा मोठा भाऊ बंटी जोशी आणि योगेश पाठक हे तिघे नर्मदा नदीत नावेमधून प्रवास करीत असताना एकाने नदीतील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. यातच छोटी असलेली नाव पाण्यात एका भागावर गेल्याने संजय जोशी आणि योगेश पाठक नर्मदा नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती असून आपत्कालीन पथक त्यांचा शोध घेत आहे. एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती प्राप्त झाली असली तरी प्रशासकीय सूत्रांकडून मात्र अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.एकाचा मृतदेह आढळलायोगेश पाठक आणि संजय जोशी हे दोघे नर्मदा नदीच्या पुरात वाहून गेल्यानंतर त्यांना शोधण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. दुपारी २ वाजताच्या सुमारास यामधील एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती आहे; मात्र अधिकृत दुजोरा प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. तर दुसर्‍या युवकाचा शोध सुरूच असून मंगळवारी सायंकाळपर्यंत दुसर्‍या युवकाचा पत्ता लागलेला नव्हता. आ. शर्मांचा थेट मुख्यमंत्रांना फोनआ. गोवर्धन शर्मा यांना अकोल्यातील दोन युवक बुडाल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर सदर युवकांसंदर्भात माहिती घेतली. दोन्ही कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना माहिती दिली. त्यानंतर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या ठाणेदारांनाही या प्रकाराची माहिती आ. शर्मा यांनी दिली.शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे मंदिर ओंकारेश्‍वर येथे आहे. या ठिकाणी भक्तनिवासाची व्यवस्था असून अकोल्यातील युवक याच भक्तनिवासात मुक्कामी होते. घडलेला प्रकार संस्थांनच्या विश्‍वस्थांना माहिती पडताच ओंकारेश्‍वर येथील संस्थानच्या पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांनी युवकाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले.