शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पहिल्या पावसाचे दोन बळी

By admin | Updated: June 15, 2015 02:45 IST

मान्सूनच्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मुसळधार सरींचे निमित्त होत मुंबईतील दोघांचा बळी गेला आहे.

मुंबई : मान्सूनच्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मुसळधार सरींचे निमित्त होत मुंबईतील दोघांचा बळी गेला आहे. पहिल्या घटनेत पवईत उद्यानातील आसन व्यवस्थेचे छत कोसळून एक जण ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत घाटकोपरमध्ये घराच्या छतावरून पडून एका व्यक्तीचा बळी गेला. पवई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील आसन व्यवस्थेचे छत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या छताखाली मद्यप्राशन करीत बसलेल्या तिघांपैकी एक जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचल्या आणि छताखाली अडकलेल्या सहदेव नाईक (४५) यांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मत्यू झाला होता.दुसऱ्या घटनेत घाटकोपरमधील चिरागनगर परिसरात घराच्या छतावर ताडपत्री टाकत असताना पडून एकाचा बळी गेला. कमल पांडे (४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते रिक्षाचालक होते. पाणी घरात झिरपू नये, म्हणून दुपारी दोनच्या सुमारास ते घरावर ताडपत्री टाकण्यासाठी चढले होते. ताडपत्री टाकून खाली उतरत असताना अंदाजे १५ ते १७ फुटांवरून ते खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला मार बसला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)