शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आधारवाडी कारागृहातून दोन कैदी पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:37 IST

आधारवाडी कारागृहातून दोन कैदी रविवारी पहाटे पळून गेले. त्यांना पळताना पाहून, तुरुंग पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आधारवाडी कारागृहातून दोन कैदी रविवारी पहाटे पळून गेले. त्यांना पळताना पाहून, तुरुंग पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. मणिशंकर नाडर आणि डेव्हिड देवेंद्रन अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे आधारवाडी कारागृहाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे. कैदी पाळाल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पळून गेलेल्यांपैकी नाडरला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली होती, तर डेव्हिडला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या विरोधात दरोडे, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांना वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. या दोघांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडून तिच्या आधारे कारागृहाच्या भिंतीवर चढून तेथून उड्या मारून पळ काढला. कारागृहातील पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ काही ठिकाणी नाकाबंदी सुरू केली; पण हे दोघे अद्याप सापडलेले नाहीत.कैद्यांचे पलायन सीसीटीव्हीत कैदआधारवाडी कारागृहातून कैदी पाळाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पसार झालेल्या दोघांवर पन्नासपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. ते सराईत गुन्हेगार असल्यानेच त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यांच्यावरील खटले प्रलंबित असल्याने, कच्चे कैदी म्हणून ते तुरुंगात होते. त्या दोघांनी पळून जाण्यासाठी कारागृहातील बंद असलेल्या सीसीटीव्हीची वायर कापली. तिचा दोरीसारखा वापर करून कारागृहाच्या भिंती ओलांडल्या. कारागृहाचे दैनंदिन कामकाज सकाळी सुरू झाले, तेव्हा दोघेही पाच नंबरच्या बराकीत होते. प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करत, दोघे बाहेर पडल्याचे काही कैद्यांनी पाहिले होते. ते बराच काळ सापडत नसल्याने, तुरु ंग पोलिसांनी आधी बराकीत शोध घेतला. तोवर त्यांनी भिंतीवरून उड्या मारल्या होत्या. नंतर ते कल्याण-भिवंडी मार्गावरील सरवली एमआयडीसीच्या दिशेने पळाले. या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. तो मोबाइवर बोलत होता. त्याचा मोबाइल हिसकावून ते त्याची दुचाकी घेऊन पळ काढण्याच्या बेतात होते, तेव्हा त्यांच्यात झटापट झाली. त्यात त्यांच्यातील एका कैद्याच्या तोंडाला मार लागला.