शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सात हजाराची लाच घेताना दोन पोलिसांना अटक

By admin | Updated: May 24, 2017 21:57 IST

पंचनाम्याच्या कागदपत्रासांठी सात हजार रूपयांची लाच घेताना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेकॉ. जगदीश चौधरी व पोलीस नाईक अनंत चौधरी

ऑनलाइक लोकमत
जळगाव, दि. 24 - पंचनाम्याच्या कागदपत्रासांठी सात हजार रूपयांची लाच घेताना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेकॉ. जगदीश चौधरी व पोलीस नाईक अनंत चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.  बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता  ही कारवाई करण्यात आली. 
 
लोंजे (ता. चाळीसगाव) येथे काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. यात एक जण ठार झाला होता.  याबाबत पंचनाम्याच्या कागदपत्राची मागणी त्याच्या नातेवाईकांकडून केली जात होती. यासाठी लोंजे बीटचे हेकॉ. जगदीश चौधरी व पोलीस नाईक अनंत चौधरी यांनी ८ हजार रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी ७ हजार रुपये देण्याचे ठरले. 
 
तक्रारदाराने ही बाब जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. यावरुन  विभागाचे अधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचला. २४ रोजी  रात्री साडेसात वाजता शहर पोलीस स्टेशनसमोर तक्रारदाराने ७ हजार रुपये  या दोघांना दिले. त्याचवेळी पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.