आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पापरी व हिवरे परिसरात वादळी वाºयासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडुन दोघे जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली़ याबाबत पोलीसाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, हिवरे येथे सदाशिव डिकरे यांच्या शेतात पेरणीचे काम करीत असता दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पांडुरंग चांगदेव लबडे (वय ६५), विष्णु नरहरी डिकरे (वय ५०), लताबाई सिद्राम मते (वय ५०), सदाशिव श्रीरंग डिकरे (वय ५०), मैनाबाई सदाशिव डिकरे (वय ४५), कविता जागनाथ डिकरे वय ३० हे सहा जण एका लहान मंदीरामध्ये बसले असता अचानक पांडुरंग चांगदेव लबडे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. तर वरील पाच जण जखमी झाले़ जखमीमध्ये दोघांची परिस्थिती चिंताजनक आहे़ जखमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ तसेच पापरी परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या योगेश सुनील भोसले (वय २०) यांच्या अंगावर त्याच दरम्यान वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ वीज पडुन मरण पावलेल्या मृतांच्या कुंटुबियास राज्य आपतकालीन मदत निधी योजनेतुन प्रत्येकी चार लाख मिळणेबाबत तात्काळ कारवाई सुरू झाली आहे़ जखमींनाही मदत देण्याबाबत आपण प्रयत्नशील राहु अशी माहिती तहसिलदार बी़ आऱ माळी यांनी दिली़
सोलापूरात वीज पडून दोघे ठार, पाच गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:59 IST