शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघातात दोघे ठार

By admin | Updated: May 9, 2016 18:17 IST

आयशर टेम्पो व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोमधील दोघे जण जागीच ठार तर दोघे जण जखमी

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 9- येथील बोरामणी नाक्यावर आयशर टेम्पो व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोमधील दोघे जण जागीच ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली़ जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़अहमद जलाल शेख (वय २५) व आण्णा जयसिंग जावीर (वय ३०, रा़ धायटी, ता, सांगोला) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत़ तर महानंदा प्रशांत मुळे (वय ३०) तर प्रथमेश प्रशांत मुळे (वय ११) ही दोघे मायलेकरं जखमी झाले आहेत़ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्ऱ एमएच १३ आर ४६०३) हा मिरची घेऊन सोलापूर येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणत होता़ त्याचवेळी दयानंद महाविद्यालयाकडून येणारी कंटेनर ट्रक (आरजे ०८ जीबी १६१९) ही अक्कलकोट पाण्याच्या टाकीकडे जात होता़ ही दोन्हीही वाहनं जुना बोरामणी चौकात वेगाने जात असताना दोघांची समोरासमोर धडक झाली़ या धडकेत कंटेनर ट्रक हा शेजारीच राहणाऱ्या महानंदा मुळे यांच्या घरात घुसून आजूबाजुच्या दुकानावर दोन्ही वाहने आदळली़ या अपघातात आयशर टेम्पोमधील अहमद जलाल शेख व आण्णा जयसिंग जावीर हे दोघे जागीच ठार झाले़ जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ किरकोळ उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले़ या घटनेची माहिती कळताच धायटी (ता़ सांगोला) येथील नागरिकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती़ जखमींना उपचारासाठी पोहेकॉ व्ही़जी़भोई यांनी मदत केली़या अपघाताची माहिती समजताच जेलरोड व जोडभावी पोलीस ठाण्याचे पालीस अधिकारी यांनी भेट दिली़ यानंतर पोलीस उपायुक्त अर्पणा गिते यांनी अपघात स्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली़घराचे व दुकानांचे झाले नुकसान....हा अपघात झाला तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते़ त्यामुळे या परिसरात फारशी वर्दळ नव्हती़ मात्र आवाज ऐकून आजुबाजुचे लोक मदतीसाठी धावून आले़ शेजारी राहणाऱ्या लोकांनी जखमींना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहचविले़ या झालेल्या अपघातात घर तसेच घरातील साहित्य, शेजारीत दोन दुकानांचे नुकसान झाले आहे़ नागरिकांनी अपघाताची माहिती कळताच पोलीसांना कळविले़ यानंतर पोलीसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़