शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

इमानला दोन पक्षाघाताचे झटके

By admin | Updated: March 6, 2017 05:48 IST

इमान अहमद ही सैफी रुग्णालयात दाखल झाल्यापासून तिला दोन पक्षाघाताचे झटके आले

मुंबई : इमान अहमद ही सैफी रुग्णालयात दाखल झाल्यापासून तिला दोन पक्षाघाताचे झटके आले. मात्र, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दोन वर्षांपूर्वीही तिला पक्षाघाताचा झटका आला होता, त्या वेळी तिच्या उजव्या बाजूवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे आजही तिच्या उजव्या बाजूला काही प्रमाणात त्रास उद्भवतो, अशी माहिती प्रशासनाने दिली.मागच्या काही दिवसांपासून इमानच्या रक्तदाबाची पातळी वाढत होती. मात्र, आता रक्तदाब नियंत्रणात आल्याने तिची प्रकृती सुधारत आहे. आहार आणि उपचारांसोबतच इमान नियमितपणे फिजिओथेरपीचे सेशन करते आहे, त्यात सध्या मेदाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी प्राधान्याने व्यायाम सुरू आहे. यानंतरच्या टप्प्यात आणखी काही कठीण फिजिओथेरपीचे प्रकार इमानला दिले जाणार असल्याची माहिती डॉ. कमलेश बोहरा यांनी दिली.इमानच्या हृदयाच्या कार्याचेही काळजीपूर्वक निरीक्षण सुरू आहे, जेणेकरून हृदयात कोणत्याही गाठी होता कामा नयेत, याकडे डॉक्टरांचे लक्ष आहे. सध्या जवळपास इमानने एकूण ५० किलो वजन घटविले आहे. यानंतर, आणखी २० वा ३० किलो वजन दोन आठवड्यांत घटविण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर आहे. इमानला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक आजार आहेत. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या उपचारांसाठी ‘बिटगिव्हिंग’ या साइट्सच्या माध्यमातून क्राउडफंडिंगद्वारे निधी उभारण्यात येत आहे. याकरिता, १ कोटींचा निधी लागणार असून, आतापर्यंत २० लाख रुपये जमा झाले आहेत. अधिक निधी जमवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. (प्रतिनिधी)>दोन आठवड्यात तीस किलो वजन घटवणारतब्बल २५ वर्षांनंतर बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीसाठी इमान इजिप्तहून भारतात दाखल होण्यासाठी घराबाहेर पडली. चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात इमानसाठी वन बेड हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. इजिप्तमध्ये राहणाऱ्या इमानचे वजन ५०० किलो असल्याने, ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला आहे. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडता आलेले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे. तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्माच्या वेळी तिचे वजन ५ किलो होते.