शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

डायरीतली दोन पानं...

By admin | Updated: October 10, 2014 23:35 IST

सरकारनामा

आज पप्पू उगाच नको ते बोलला. मतदान पाच-सहा दिवसांवर आलं असताना पत्रकार परिषद घेऊन साहेब आणि त्या इस्लामपूरकरावर आगपाखड केली. या पप्पूला आताच बोलायची काय गरज होती? बोलला दोघांवर, पण अडचणीत येणार सगळेच. त्याला आता पाच वर्षं काही काम नाही. डिप्रेशनमध्ये दिसतोय. लोकसभेला पडल्यापासून त्याचं असं सुरू आहे. आम्ही निवडून येतोय म्हटल्यावर, तर त्याचं फ्रस्ट्रेशन वाढलंय. यावेळी वातावरण चांगलं असताना ‘मला नाही, तुला नाही, घाल तिसऱ्याला’ असं करून डाव विस्कटायला या पप्पूचं काय जातंय? त्याला निवडणुकीत दोन महिने सिमल्याला पाठवून दे, असं विशालला आधीच सांगितलं होतं. ‘प्रतीक, असं करू नकोस, कशाला त्या शेट्टी-फिट्टी गँगच्या नादाला लागलायस?’ असं सांगूनही ऐकत नाही. आधी आपलं बस्तान बसवावं, मग बाकीच्यांच्या मागं लागावं, इतरांचे देव उठवावेत, हे याला कधी कळणार? काय करावं कळत नाही. साहेब आम्हाला ओव्हरटेक करतायत, हे मला दिसत नाही काय? पण ही वेळ नाही ना... पप्पूबाबत साहेबांचा आणि विश्वजितचा मगाशीच फोन येऊन गेला. आता त्याला एखादी नवी स्पोर्टस् कार घेऊन द्यावी का, असं वाटायला लागलंय. कार घेऊन दिल्यावर जाईल लाँग ड्राईव्हवर... नाहीतर बसंल खोलून मॉडीफाय करत... चार दिवस घोर तर राहणार नाही. बघू, उद्या सकाळी ठरवू... सुरेशअण्णाचा फोन का यायला लागलाय?... परवा म्हणत होता, कमळासाठी माझा बळी दिलाय म्हणून... खुळंच दिसतंय... सांगत होतो, ऐकलं नाही त्यावेळेला... बघू काय म्हणतोय...(डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचं फाडलेलं हे पान भाऊंच्या ‘विजय’ बंगल्याच्या काटेरी कुंपणात अडकलं होतं... एकच पान सापडल्यानं पुढचा मजकूर काही कळला नाही. काही ठिकाणी फुल्या मारल्या होत्या. तेथे बहुदा कोणते शब्द वापरायचे हे ठरले नसेल. काही ठिकाणी खाडाखोडही दिसत होती. उद्या मानसिक आरोग्य दिन असल्याची तळटीप मात्र ठळक करण्यात आली होती. )-(आणि हे दुसऱ्या डायरीतलं दि. ९ आॅक्टोबरचंच पान. अर्थात फाडून टाकलेलं नसलं तरी व्हॉटस् अ‍ॅपवरून सगळीकडं फिरत असलेलं...)  आज सकाळी सुधीर, सुरेंद्रदादा यांच्यामार्फत साहित्य पाठवलंय. घोरपडे सरकारांनी तंगी असल्याचं रात्री सांगितलं होतं. त्यांना पक्षाकडनं मटेरियल आलं तरी ते पुरेना म्हणे! मोदी येऊन गेल्यावर उलट आबालाच सहानुभूती मिळत असल्याचं काका म्हणत होते. तसंच दिसतंय. त्यामुळं सरकारांनी हात पसरलाय वाटतं. मागच्या लोकसभेची बाकी अजून राहिलीय, त्याचं काय? तरी बरं, अमरबापूनं अजून काही मागितलं नाही! दुपारी जगतापसाहेबांनी जतच्या मटण लोणच्याचा डबा पाठवला होता. झणझणीत होतं. जिभेच्या बाभळी गेल्या. गुळमुळीत बोलून-बोलून अजीर्ण झालं होतं. त्या दिवशी गडकरींनी कामेरीत येताना नागपूरवरून आणलेलं सावजीचं मटण आणि वडाभातही बेस्ट होता.मानसिंगभाऊला सांगितलंय, शेवटच्या चार दिवसांत धुरळा पाड म्हणून. महाडिक कंपनीचं काहीतरी बघितलं पाहिजे. देशमुखांकडनं निरोप आलाय, शिवाय घरातली कुरकूर आहेच, त्यामुळं भाऊकडं (सत्यजित नव्हे मानसिंग) नीट लक्ष देता येईना. देशमुखांविरोधात स्टेजवरूनही बोलता येत नाही. पण मानसिंगभाऊची आणि आटपाडीची सीट काढायचं घोंगडं मोठ्या साहेबांनी गळ्यात अडकवलंय. सांगलीत आमचा लोच्या झालाय, असं सुरेशअण्णा म्हणतायत म्हणे! अजितदादाकडंनं तिकीट आणतात काय? मलाही तेच पाहिजे होतं. कुणाचा ‘कार्यक्रम’ करायचाय, हे अण्णांना आधीच सांगितलं होतं. पण ऐकायला नको? बजाज कंपनी, भालचंद्र, दिग्विजयला ते माहीत आहे, म्हणून बरं. त्यांनी सगळ्यांना निरोप पोहोचलाय की नाही, ते उद्या तपासायला पाहिजे. सोमवारनंतर फिरवाफिरवी करायला लागेल. कदमसाहेबांची आणि माझी भेट झाल्याच्या कालच्या व्हॉटस् अ‍ॅपवरच्या मेसेजनंतर प्रतीक बिथरला आणि त्यानं प्रेसपुढं दंगा केला. आम्ही होनमोरेला पळवल्यापासून आणि जितेंदरनं दगा दिल्यापासून त्याची गडबड सुरू झालीय. आपल्याला हवं तसं घडतंय. दादा फॅमिलीत भांडणं लागलीच पाहिजेत. कदमसाहेबांना रात्री बारानंतर फोन करायचाय. पावणेबारा झालेत. चला, लिहायचं थांबवून बाहेर पडू... बरीच कामं बाकी आहेत.शूऽऽऽ हे कुणाच्या डायरीतलं पान आहे, हे ओळखलंच असेल!)- श्रीनिवास नागे