मुंबई : ख्रिसमसच्या सुटीत उत्तराखंडला गेलेले मुंबईतील ठाकूर महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी हृषिकेश येथे वॉटर रॅपलिंगदरम्यान, हा अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. करण जाधव आणि विनय शेट्टी अशी त्यांची नावे असून त्यांचे पालक हृषिकेशला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात ‘बॅफ’च्या शेवटच्या वर्षात हे दोघे शिकत होते. उत्तराखंडला गेलेल्या ८० जणांच्या सहलीत ‘ठाकूर’चे ११ जण होते. वॉटर रॅपलिंगदरम्यान पाण्यात पडलेल्या विनयला वाचविण्यासाठी करणने उडी मारली. मात्र, वेगवान प्रवाहामुळे दोघेही वाहून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबईचे २ विद्यार्थी हृषिकेशमध्ये बेपत्ता?
By admin | Updated: January 4, 2017 05:39 IST