शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
3
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
4
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
5
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
6
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
7
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
8
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
9
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
10
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
11
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
12
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
13
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
14
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
15
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
16
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
17
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
19
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
20
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

दोन महिन्यापासून शिक्षक पगारापासून वंचित

By admin | Updated: May 7, 2014 20:57 IST

मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे संपूर्ण शिक्षकांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळामध्ये सर्व शिक्षक आर्थिक तंगीचा सामना करीत आहेत.

सिंदखेडराजा : मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे संपूर्ण शिक्षकांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळामध्ये सर्व शिक्षक आर्थिक तंगीचा सामना करीत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार महिन्याच्या १ तारखेलाच पगार होणे अपेक्षित आहे. परंतु अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे शिक्षक बांधवांना कृत्रिम आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शालार्थ वेतन प्रणालीचे कारण पुढे करुन जिल्हा व तालुका शिक्षण विभाग परस्परांवर दोष ठेवून पगाराच्या विलंबाचे समर्थन करीत आहेत. शालार्थ वेतन प्रणालीमध्ये कामाच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे या कामाला पाच महिन्याचा उशिर झाला. त्याचे खापर मात्र शिक्षकांच्या माथी फोडण्यात येत आहे. संबंधित कर्मचार्‍यांना या ना त्या कारणामुळे दररोज घसघशीत पॉकेटमनी मिळत असल्यामुळे शिक्षकांच्या पगाराच्या निर्धारित तारखेचे त्यांना भान राहत नाही. जि.प. व पं.स. मधील शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून टोलवा टोलवीची व परस्पर विसंगत विधाने ऐकायला मिळतात. पगार विलंबाला शिक्षक जबाबदार नसून शिक्षण विभागातील कर्मचारी जबाबदार आहेत. शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे कुटूंबिय आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. तरी शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी तात्काळ निर्णय घेवून शिक्षकांचे दोन महिन्याचे पगार लवकरात लवकर अदा करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष टी.के.देशमुख, सरचिटणीस रविंद्र नादरकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)