शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांनंतरही दुहेरी खुनाचा लागेना छडा

By admin | Updated: June 5, 2017 00:42 IST

महाराष्ट्र हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक, युवती यांच्या दुहेरी खून प्रकरणाला शनिवारी दोन महिने पूर्ण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : महाराष्ट्र हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक, युवती यांच्या दुहेरी खून प्रकरणाला शनिवारी दोन महिने पूर्ण झाले. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नसल्याने मृत युवक व युवतीच्या नातेवाइकांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आहे.मागील महिन्यात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होती. मात्र, एसआयटीच्या तपास पथकालाही प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलेले नाही.२ एप्रिल रोजी रात्री लोणावळा आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट डोंगरावर सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा अहमदनगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे व पुणे जिल्ह्यातील श्रुती डुंबरे या विद्यार्थी व विद्यार्थिंनीचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांच्या अंगातील कपडे काढून दगडाने व अज्ञात हत्याराने डोक्यात व शरीरावर वार करण्यात आले होते. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा हादरून गेले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील १४ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आठ तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयतांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली. हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणांसाठी केला असावा याचा मागोवा घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. या प्रकरणाला एक महिना उलटल्यानंतरही तपास यंत्रणांना अपयश आल्याने मृत सार्थकच्या आईने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत २० मे रोजी आत्मदहन करण्याचा तर नातेवाइकांनी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा २ मे रोजी लोणावळा पोलिसांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. आरोपींची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवत ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यालाही महिना उलटला. मात्र, गेल्या दोन महिन्यांत तपासात प्रगती झाली नसल्याने याप्रकरणी पोलिसांचे हात रिक्तच राहिले आहेत.