शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांतील मोटार खरेदी आता ‘आयटी’च्या रडारवर

By admin | Updated: December 29, 2016 03:50 IST

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत मोटारी खरेदी करणाऱ्यांना प्राप्तिकर विभाग आता रडारवर घेणार असून, अशा खरेदीदारांची सर्व माहिती घेण्यासाठी विभागाने

मुंबई : नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत मोटारी खरेदी करणाऱ्यांना प्राप्तिकर विभाग आता रडारवर घेणारअसून, अशा खरेदीदारांची सर्व माहिती घेण्यासाठी विभागाने मोटारी विकणाऱ्या ५०हून अधिक प्रमुख डीलरना नोटिसा पाठविल्या आहेत.नोटाबंदीनंतर अनेकांनी चलनातून बाद झालेल्या नोटा देऊन मोटारींची खरेदी केल्याचा प्राप्तिकर विभागास संशय आहे. एकूणच उघडपणे उत्पन्न दाखवून त्यावर रीतसर कर भरणारे आणि मोटारींची विक्री, यांच्या आकडेवारीतील विसंगती मोठ्या प्रमाणावर करबुडवेगिरीकडे संकेत करणारी आहे. या दृष्टीने प्राप्तिकर विभागाने या नोटिसा पाठविल्या आहेत.या नोटिसा पाठवून प्राप्तिकर विभागाने गेल्या दोन महिन्यांत मोटारी खरेदी केलेल्या ग्राहकांची नावे, त्यांच्या बँक खात्यांचा तपशील, पत्ते, खरेदी केलेल्या मोटारींची मॉडेल, खरेदीची तारीख, अदा केलेली रक्कम यासह इतर माहिती देण्यास डीलरना सांगितले आहे.डीलरकडून मिळणाऱ्या माहितीची छाननी केली जाईल व त्यातून जे व्यवहार संशयास्पद वाटतील, त्यांची चौकशी ३० डिसेंबरनंतर सुरू केली जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)करदाते २४ लाख; दरवर्षी वाहन विक्री २५ लाख- ज्या लोकांकडे मोटारी खरेदी करण्याएवढा पैसा आहे, त्यापैकी सर्वच खरे उत्पन्न दाखवून त्यावर कर भरत नाहीत, असे स्पष्ट संकेत प्राप्तिकर विभागाकडील आकडेवारी व मोटारविक्रीचे आकडे यावरून मिळतात.ज्यांनी रीतसर रिटर्न भरून 10लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न दाखविले आहे, असे करदाते २४.४ लाख आहेत.- या तुलनेत गेली सलग तीन वर्षे देशात वर्षाला सरासरी २५ लाख मोटारींची विक्री झाली आहे. एक कोटी किंवा त्याहून अधिक उत्पन्नाचे रिटर्न भरणारे करदाते ४८,४१७ आहेत. त्या तुलनेत बीएमडब्ल्यू, आॅडी, जग्वार, मर्सिडिस, पोर्शे व मासेराती यासारख्या आलिशान मोटारी खरेदी करणाऱ्यांची वार्षिक संख्या सुमारे ३५ हजार आहे.एरव्हीच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यांत मोटारींच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. काळा पैसा हुडकणे व तो बाहेर काढणे, हाही नोटाबंदीचा एक प्रमुख हेतू आहे. त्यामुळे बाद नोटांच्या रूपाने काळा पैसा वापरून मोटारी खरेदी केल्या गेल्या काय, याचा शोध घेण्यासोबतच संभाव्य करबुडव्यांचाही या माहितीतून छडा लावणे शक्य होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.