शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातल्या दोन साहित्यिकांचे अर्ज

By admin | Updated: September 2, 2015 01:16 IST

ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातून ८९व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर मंगळवारी विदर्भ साहित्य

नागपूर : ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातून ८९व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर मंगळवारी विदर्भ साहित्य संघात त्यांनी दुसरा अर्ज भरला. विदर्भातीलच ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी विदर्भ साहित्य संघातून अर्ज भरल्यानंतर मंगळवारी मुंबई मराठी साहित्य संघातून दुसरा अर्ज भरला आहे. यामुळे सध्यातरी विदर्भातले दोन साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदाच्या शर्यतीत कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. विठ्ठल वाघ यांनी आता होऊन जाऊ द्या, असा नारा दिला आहे. गेली ४० वर्षे घरादाराकडे लक्ष न देता खेड्यापाड्यात कविता वाचनाचे कार्यक्रम केले. कविता घराघरात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. शेतकरी आणि शेतमजूर यांचे दु:ख सातत्याने कवितेतून मांडले. प्रामुख्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केवळ पॅकेजने प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांची समस्या सुटली नाही आणि त्यामुळेच संमेलनाध्यक्ष होऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण या शर्यतीत उतरल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला पाठिंबा मिळत असून संमेलनाध्यक्ष होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. विठ्ठल वाघ यांनी आज विदर्भ साहित्य संघात दोन अर्ज भरले. काही कारणाने वा अनावधानाने एखादा अर्ज चुकला तरी उमेदवारी रद्द होऊ नये, म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. त्यांचे सूचक डॉ. मनोज तायडे असून अनुमोदक डॉ. बबन तायवाडे, बबन नाखले, अतुल लोंढे, कुमार बोबडे आहेत. तर दुसऱ्या अर्जात सूचक मनोज तायडे असून अनुमोदक बबन तायवाडे, बबन नाखले, अतुल लोंढे, कुमार बोबडे आणि शरयू तायवाडे आहेत. मुंबईतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी भरलेल्या अर्जात सूचक अशोक कठाळे तर अनुमोदक डॉ. उषा देशमुख, नीलिमा भावे, दीपक घारे, शुभांगी पांगे, डॉ. पुष्पलता शेट्ये आहेत. मुंबईतून रवींद्र शोभणे यांचा एकमेव अर्ज या शर्यतीत आहे. ३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची वेळ असून सायंकाळी ७ वाजता या शर्यतीत कोण उमेदवार आहे, ते स्पष्ट होणार आहे.