ऑनलाइन टीम
ठाणे, दि. ११ - मुंब्रा बायपास येथे टँकर घरावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी देवरीपाडा येथे झालेल्या या अपघातात केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटला व रस्त्याच्या बाजूस असलेल्या झोपडपट्टीवर कोसळला. या अपघातात दोन घरांचे नुकसान झाले असून ढिगा-याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला. अपघातात मधू प्रभाकर हळदे (वय १५) आणि हरी भिकू चव्हाण (वय ३५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर प्रभाकर हळदे (वय ४०), भारती हळदे ( वय ३५), प्रियांका हळदे (वय १७), शिवाजी दाभाडे (वय ३६), तेजस दाभाडे (वय ४), रुपाली दाभाडे (वय ११) आणि मणीलाल पाल हे सात जण जखमी झाले आहेत. .
दरम्यान घरांवर उलटलेला हा टँकर उचलण्याचे काम अद्याप सुरू आहे.