शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटामध्ये बस उलटून दोन ठार

By admin | Updated: January 4, 2016 03:59 IST

नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटामध्ये लक्झरी बस व स्विफ्ट डिझायर गाडीची समारोसमोर धडक होऊन या अपघातामध्ये लक्झरी बस उलटल्याने दोन जण जागीच ठार झाले

मढ : नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटामध्ये लक्झरी बस व स्विफ्ट डिझायर गाडीची समारोसमोर धडक होऊन या अपघातामध्ये लक्झरी बस उलटल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर इतर गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींची निश्चित संख्या समजू शकली नाही. ही घटनाआज रविवारी (दि. ३) रात्री ८ च्या सुमारास माळशेज घाटात वळण मार्गावर घडली.मढ, खुबी, सावरणे तसेच एमटीडीसीमधील कर्मचाऱ्यांनी बसमधील जखमींना तत्परतेने बाहेर काढून पुढील उपचारासाठी आळेफाटा, ओतूर, मढ, खुबी, सावरणे या गावांमधील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन लक्झरी, मुरबाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी : लक्झरी बस (एमएच ०४ जी ४२४०) ही बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन कल्याणकडे जात असताना माळशेज घाटामध्ये वळणमार्गावर कल्याणहून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (एमएच २३ वाय २२४७) यांची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये लक्झरी बसमधील दोन जण जागीच ठार झाले असून, बसमधील अन्य जखमींचा आकडा समजू शकला नाही. दरम्यान, घटनेची माहिती समजताच ओतूर पोलीस व टोकावडे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.या अपघातामध्ये परमेश्वर हारमोळे व कोतेकर (दोघेही रा. उल्हासनगर) दोघे जण जागीच ठार झाले आहेत. आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलेल्या जखमींची नावे : लक्ष्मीबाई सोनवणे (रा. करडा), रामा आसरे (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश), किसान कोष्टी (रा. उल्हासनगर), रितिका कदम (रा. नाशिक), संजय कदम (रा. नाशिक), अनिता खोर (रा. उल्हासनगर), अरुणा सूर्यराव (रा. उल्हासनगर) जखमींना आळेफाटा येथील डॉ. सोनवणे हॉस्पिटल व माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लक्झरी बसमध्ये एकूण ५५ पुरुष व स्त्रिया होत्या. अपघातामधील जखमींचा निश्चित आकडा समजू शकला नाही. (प्रतिनिधी)