मृतांमध्ये बालकाचा समावेशनिपाणी : संकेश्वरजवळ जेजुरीला जाणारा टाटा सुमो उलटून झालेल्या अपघातात निपाणीजवळील मसोबा हिटणी फाट्यावर तवेराने धडक दिल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गंगाराम धामणेकर (रा. अगसगे, ता. बेळगाव) आणि कुणाल सुनील पुजारी (वय ५, रा. मसोबा हिटणी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर टाटा सुमोमधील १३ जण जखमी आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताग्रस्त आहे.नार्वेकर आणि धामणेकर कुटुंबीय नवीन जोडप्यांना घेऊन टाटा सुमोने जेजुरी येथील खंडोबाच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी संकेश्वरजवळील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून संरक्षक कठड्याला धडकली. त्यामुळे सुमो उलटली. त्यामध्ये नववधूचे वडील गंगाराम धामणे यांचा मृत्यू झाला.या अपघातात अक्षता डावरे (शिवाजीनगर, बेळगाव), युवराज चौगुले (सुमो चालक), पार्वती धमणेकर (रा. अष्टे), धनश्री पाटील, यल्लूबाई धामणेकर, सुनीला पाटील, लक्ष्मी होनगेकर (सर्व रा. अगसगे), स्मीतल पाटील, श्रेया पाटील आणि सविता पाटील (सर्व रा. सावगाव, ता. बेळगाव) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना संकेश्वर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. रस्ता पार करताना भरधाव जाणार्या तवेराने जोराची धडक दिल्याने बालक ठार झाल्याची घटना निपाणीजवळील मसोबा हिटणी फाट्यावर घडली. कुणाल सुनील पुजारी (वय ५, रा. मसोबा हिटणी) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. प्रतिनिधी.
निपाणी, संकेश्वरजवळील अपघातात २ ठार, १३ जखमी
By admin | Updated: May 7, 2014 13:33 IST