शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी

By admin | Updated: June 3, 2017 13:37 IST

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर औंढे गावाजवळ भरधाव वेगात येणारी झायलो मोटार उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 3 -  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर औंढे गावाजवळ भरधाव वेगात येणारी झायलो मोटार उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एका 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता तर अपघातात जखमी झालेली  महिला उपचारादरम्यान दगावली. 
 
तर एकूण 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.  यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर  हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली झायलो ही प्रवासी मोटारमधील  (MH 04 GD 438)  चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही मोटार  रस्त्याच्याकडेला असलेल्या डब्लू बॅरिकेटला जाऊन धडकली व उलटली.  
 
सर्व जखमींना खंडाळा महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आर्यन देवदूत पथक व आयआरबीचे कर्मचारी यांनी गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले.