जळगाव : कुसुंबा येथे आत्याकडे गेलेल्या रामेश्वर कॉलनीतील दोन बहिणी शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कुसुंबा येथील गो-शाळेतून गायब झाल्या. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात नोंद आहे. रामेश्वर कॉलनीतील दोन्ही चुलत बहिणी शनिवारी कुसुंबा येथील आपल्या आत्याकडे गेल्या होत्या. या संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आत्यासह कुसुंबा येथील गो-शाळा पाहण्यासाठी आल्या. गोशाळा पहात असताना दोन्ही बहिणी ताक घेण्यासाठी गेल्या. बराच वेळ झाल्यानंतर त्या न आल्याने त्यांनी शोधाशोध केली. आत्याच्या खबरवरून औद्योगिक वसाहत पोलिसात हरविल्याची नोंद आहे. तपास साहाय्यक निरीक्षक आर.टी. धारबडे करीत आहेत.