शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुगाच्या विषारी शेंगा खाल्ल्याने दोन मुलींचा मृत्यू

By admin | Updated: August 27, 2016 02:58 IST

तिस-या मुलीचीही प्रकृती गंभीर; अकोला जिल्ह्यातील पोपटखेड येथील घटना.

अकोला, दि. २६: तिघी मैत्रिणींनी शुक्रवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास मुगाच्या शेंगा खाल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने तिघीही मुलींना दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिघींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसर्‍या मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु तिचाही मृत्यू झाला. तिसर्‍या मुलीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार करण्यात येत आहेत. पोपटखेड येथील साक्षी विजय रंगारी (१४), आरती तिरथ उके आणि लक्ष्मी रवी गावंडे (१२) या तिघी मुली शुक्रवारी दुपारी शाळेतून घरी आल्या. तिघीचेही आई-वडील शेतमजूर असल्याने शेतात गेले होते. आरती उके व लक्ष्मी गावंडे या दोघी साक्षीच्या घरी जेवणाचे ताट घेऊन आल्या आणि तिघी जेवण करीत होत्या. दरम्यान, शेतातून तोडून आणलेल्या मुगाच्या शेंगा तिघींनी खाल्ल्या. काहीच वेळातच तिघींनाही मळमळ आणि उलट्या व्हायल्या लागल्या. पोट दुखू लागले; परंतु घरी कोणी नसल्याने, या तिघी मुली तशाच पडून राहिल्या. गावातील काही लोकांना ही बाब कळल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना शेतातून बोलावण्यात आले. आई-वडील घरी आल्यावर तिघींनाही थेट सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. साक्षी रंगारी व आरती उके या दोघींची प्रकृती गंभीर होती; परंतु काही वेळातच आरती उके हिची प्रकृती आणखीच गंभीर झाली. उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर साक्षी रंगारी हिची प्रकृती खालावल्याने, तिच्या कुटुंबीयांना तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु साक्षीचाही मृत्यू झाला. अशी माहिती सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. आरती व साक्षीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते. लक्ष्मी गावंडे हिची प्रकृती पाहता, तिला सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले आहे. दोघींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. निरागस जीव आणि कुटुंबीयांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मुगाच्या शेंगा कोणाच्या शेतातील?विषारी मुगाच्या शेंगा खाल्यामुळे दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांनी या विषारी मुगाच्या शेंगा कोणाच्या शेतातून तोडून आणल्या होत्या, याची चर्चा रुग्णालयात सुरू होती.