शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दोन मैत्रिणींची आत्महत्या

By admin | Updated: July 21, 2016 05:05 IST

डगाव शेरी येथील दोन मुलींनी एकमेकींचे हात बांधून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली़

पुणे : वडगाव शेरी येथील दोन मुलींनी एकमेकींचे हात बांधून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली़ स्रेहा सदानंद मोरे (१५) आणि छोटीकुमार अजितकुमार सिंग (१५) अशी त्यांची नावे आहेत़ या मुलींचे प्रेमसंबंध असल्याचे व ते पालकांना समजल्याने ते रागावतील, या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे़ शनिवारी सकाळी त्या व त्यांच्या आणखी दोन मैत्रिणी शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी फुटबॉल मॅच खेळायला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडल्या़ त्यानंतर, त्यांनी त्यांच्या चार मित्रांना फोन करून बोलावून घेतले. मग ते सर्व दुचाकीहून खराडीतील डॅमवर आले. खराडी डॅमवरून त्याचे मित्र निघून गेले़ त्यांनतर, चौघींपैकी एकीच्या घरी त्या सर्व जणी जेवणासाठी गेल्या. जेवण करत असतानाच दोघींना (स्नेहा व छोटीकुमारी) एकाच वेळी घरून फोन आला व त्यातील छोटीकुमारीला तिच्या बहिणीने फोन करून सांगितले की, तुम्ही शाळेत गेला नाहीत, हे वडिलांना समजले असून, ते खूप चिडले आहेत. असे बोलल्यानंतर त्या दोघी तेथून दीडच्या दरम्यान निघून गेल्या.छोटीकुमारी व स्नेहा यांनी त्यांच्या मित्रांना चार वाजता फोन करून सांगितले की, आमच्या घरी समजले आहे. त्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत. त्यांनतर त्या दोघींच्या मित्रांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल बंद होता. दोघी घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली़ (प्रतिनिधी)वडगावशेरी येथील स्मशानभूमीजवळ कुमार प्रायमवेरा सोसायटीसमोर नदीपात्रात बुधवारी त्यांचे मृतदेह आढळले़ एकीचा उजवा व दुसरीचा डावा हात बांधून दोघींनी नदीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी बूट, शालेय दप्तर व खेळाचे साहित्य सापडले असून, ही आत्महत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.