अकोला : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पश्चिम वऱ्हाडातील दोन शेतकऱ्यांनी रविवारी आत्महत्या केली. सिंदखेडराजातील जऊळका येथील गोविंदा साळवे (६८) यांची देवानगर शिवारात ६ एकर शेती आहे. त्यांच्यावर बँकेचे १ लाख ३२ हजार रुपये कर्ज आहे. नापिकी व कर्जाला कंटाळून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मालेगावातील दुबळवेल येथील बबन सदाशिव पोफळे (५५) या शेतकऱ्याने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून, बँकेचे २० हजार रुपये कर्ज होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वऱ्हाडात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: September 14, 2015 01:58 IST