नांदेड / उस्मानाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे शेतकरी नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील होते.नांदेडमधील कंधार तालुक्यातील नावद्यांची वाडी येथील राजकुमार माधव केंद्रे (२६) या शेतकऱ्याने शेतात विषप्राशन केले होते. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. पेरणीसाठी उसनवारी करून घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने राजकुमार गेले काही दिवस चिंतेत होते. तसेच उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातील कडदोरा परिसरात बब्रुवान शामराव पाटील (६८) यांनी शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली़ चार वर्र्षांपासूनच्या दुष्काळामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते़ खरिपातील सोयाबीन, उडीद ही काढणीला आलेली पिके अतिवृष्टीमुळे हातची गेली़ त्यामुळे बँकेचे कर्ज फेडायचे कसे, या चिंतेतून त्यांनी स्वत:ला संपविले. (प्रतिनिधी)नंदुरबारमध्ये दोघांच्या आत्महत्यानंदुरबार जिल्ह्यात एका महिलेसह दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना शनिवारी घडल्या. सुरेश जिऱ्या वळवी (५०) यांनी नशेत घरातील बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तर पूनम गिरीष सेन (३०) या महिलेने आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली़
मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: November 7, 2016 06:02 IST