शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: January 15, 2015 00:18 IST

बनेवाडीत एकाने घेतला गळफास : शेटफळेत डाळिंब बागायतदाराचे विषप्राशन

कवठेमहांकाळ /आटपाडी : विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही पसरू लागले आहे. आज, बुधवारी एकाचदिवशी सांगली जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथील प्रकाश जाधव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून गळफास लावून घेतला, तर आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील डाळिंब बागायतदार विलास गायकवाड यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.बनेवाडी येथील प्रकाश विठोबा जाधव (वय ४०) या शेतकऱ्याने आज, बुधवारी कर्जाला कंटाळून घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृत प्रकाश जाधव मूळचे कर्नाटकातील अथणी तालुक्यातील कात्राळ या गावचे असून, लहानपणापासूनच ते मामाकडे बनेवाडी या गावी राहत होते. त्यांचे मामा हरी शिंदे सैन्यात अधिकारी असून, त्यांनी जाधव यांच्या नावे दोन एकर जमीन करून दिली होती. त्या दोन एकरामध्ये प्रकाश जाधव यांनी द्राक्षे, डाळिंब आणि ऊस लावला आहे. या पिकांवर बँकेचे व विकास सोसायटीचे कर्ज काढले आहे. कर्जाची रक्कम चार लाखांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. द्राक्ष आणि डाळिंब बागेवर जाधव यांनी मोठा खर्च केला होता, मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यात बाग सापडली. रोगांनी पूर्ण बागच वाया गेल्याने ते चिंतेत होते. बँकेने आणि सोसायटीने कर्जफेडीबाबत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली होती. या कर्जाला कंटाळूनच जाधव यांनी घरी तुळईला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.शेटफळेतील डाळिंब बागायतदाराची नैराश्यातून आत्महत्या दुसरी आत्महत्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे घडली. ज्या डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना लखपती होण्याचे स्वप्न दाखविले, ते डाळिंब यंदा उत्पादन खर्चाएवढंही उत्पन्न देऊ न शकल्याने आज शेटफळे येथील विलास ज्ञानू गायकवाड (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने त्याच्या डाळिंबाच्या बागेतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कृषीविषयक पदव्युत्तर शिक्षण (एमएस्सी अ‍ॅग्री) घेऊन राहुरीला कृषी विद्यापीठात काही वर्षे प्राध्यापक म्हणून विलास गायकवाड नोकरी करीत होते.पाच वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून शेटफळे येथे अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याचे ठरवून गाव गाठले. त्यांची डाळिंबाची २०० झाडे आहेत. सध्या तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागांवर कमी-अधिक प्रमाणात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. विलास गायकवाड यांच्या बागेवरही तेल्याने विळखा घातला आहे. तेल्या रोगावर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्चून महागडी कीडनाशके आणि बुरशीनाशके फवारून बाग यशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही.तेल्याचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाची फळे उलली. अशी उललेली फळे सध्या आटपाडीतील डाळिंबाच्या सौद्यात खरेदी केली जात नाहीत. अशी फळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणली, तरी ती व्यापारी नाकारतात. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंबे फेकून द्यावी लागत आहेत. एवढा खर्च करूनही डाळिंबाच्या बागेत अपयश आल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.काल (मंगळवारी) रात्री कुणास काही न सांगता विलास घरातून निघून गेले. त्यांचा मोबाईलही सायंकाळी चार वाजल्यानंतर बंद होता. आज सकाळी चंद्रभान गायकवाड यांना जनावरे घेऊन शेतात गेल्यावर त्यांचा मृतदेह दिसला. याबाबत विलास यांचे चुलत बंधू पोपट कृष्णा गायकवाड यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार ए. के. भवारी करीत आहेत.आधुनिक शास्त्राने शेती करून फायद्याची शेती करण्यासाठी विलासने डाळिंबाची बाग लावली. शेतातील एवढे शिक्षण घेऊन आणि आटोकाट प्रयत्न करूनही अपयश आल्याने त्याने मृत्यूला कवटाळले. डाळिंबानेच माझ्या भावाचा बळी घेतला.- पोपट गायकवाड, शेटफळे